शिरूर तालुक्यात पाण्याअभावी पीके लागली जळू

शिक्रापूर, ता.२३ अॉक्टोबर २०१८ (प्रतिनीधी) : शिरूर तालुक्यात चालू वर्षी पावसाळा पूर्णपणे कोरडा गेल्याने व एकही मोठा पाउस न झाल्याने पूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे, त्यामुळे शेतक-यांचे आर्थीक गणित कोलमडले आहे.

पाण्याअभावी पीके जळू लागली असून फळबागाही सुकू लागल्याने शेतक-यांचे अतोनात नुकसान होत आहे.कांदा व उसाचे पिक मोठया प्रमाणात सुकल्याने शेतकरी मेटाकूटीला आला आहे. पाणी टंचार्इच्या तिव्र झळा जाणवू लागल्या आहेत त्यामुळे चासकमान धरणातून डाव्या कालव्यात अधिकचे आवर्तन सोडण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

शिरूर तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम कोरडा गेला आहे.तर शेतक-यांच्या विहीरी व विंधन विहीरींना देखील पाणी खोल गेल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या मोठया प्रमाणात भेडसावत आहे.पाण्याअभावी कांदा, मका, उस पिक मोठया प्रमाणात करपल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.फळबागांना देखील पाणी नसल्याने त्या सुकू लागल्या आहेत.

अॉक्टोबर महिण्यातच पाणी टंचार्इ जाणवू लागल्याने बळीराजा चिंतातूर असून पुढील कांही दिवसात पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चा-याची व पाण्याचीही गंभीर समस्या निर्माण होणार असल्याने निदान चारा पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी  चासकमानचे नियोजनाप्रमाणे तसेच एखादे अधिकचे आवर्तन डाव्या कालव्यातून व वेळ नदीतून सोडण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या