तळेगावमध्ये 10 तर कोंढापुरीत 8 एकर ऊस खाक

Image may contain: one or more people, sky, mountain, outdoor and natureतळेगाव ढमढेरे, ता.२५ अॉक्टोबर २०१८ (जालिंदर आदक) : येथील चिमणापिरमळा मधील सुमारे दहा एकर ऊस विजेच्या शॉटसर्किटमुळे ठिणग्या पडून जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

तळेगाव ढमढेरे येथील दहा एकर क्षेत्रातील उसाला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे झालेले नुकसान शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातून गेलेल्या वीजवाहक तारा लटकत असल्यामुळे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तारा चिटकून ठिणगी उडाली आणि ऊसाने पेट घेतला, पाहता पाहता जाळाचे लोट मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आगीची तीव्रता खूपच मोठी होती ऊस हा दीड वर्षाचा आडसाली असल्यामुळे आग विझवणे खूपच अवघड होते.

शेतात काम करणारे सचिन पिंगळे, किरण पिंगळे, राहुल पिंगळे यांनी आरडाओरडा करून तसेच इतरांना फोन द्वारे संपर्क करून मदतीसाठी बोलावले. त्याचबरोबर चंद्रकांत भुजबळ, दत्तात्रय केदारी यांनी ट्रॅक्टर ला रोटावेटर जोडून एका बाजूला पाचट बाजूला सारत मोठा पट्टा केला त्यामुळे पुढील मोठी हानी वाचली. उपस्थित सर्वांनी आग आटोक्यात आणण्यास मोठी मदत केली. त्याचबरोबर आगीचे लोट पाहून अनेक जण मदतीसाठी धावून आले. ३० ते ४० जणांच्या प्रयत्नाने आग विझवणे सोपे गेले त्यामध्ये संदीप ढमढेरे, महेंद्र पिंगळे, घनश्याम तोडकर, संजय पिंगळे, रुपेश पिंगळे, गजानन भुजबळ, शंकर भुजबळ व इतर शेतकऱ्यांनी मदत केली.

या वेळी प्रसंगावधान राखत जवळच असणारा २०ते २५ एकर ऊस हा पेटण्या पासून वाचला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्या मोहिनी पिंगळे यांनी शर्तीचे प्रयत्न करून मोठी दुर्घटना टाळण्यास मदत केली. शेतकऱ्यांना कृषी व विद्युत वितरण करीत पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची मागणी आहे.

कोंढापुरीत अज्ञाताने 8 एकर ऊस पेटवला
कोंढापुरी (ता. शिरूर) येथे बुधवारी (ता. 24) आठ एकरांतील ऊस अज्ञात व्यक्तीने पेटवून दिला. यामध्ये सुभाष विष्णू गायकवाड, सुधीर श्‍यामराव गायकवाड, दौलत बबन गायकवाड यांच्यातर्फे त्यांचे वारस मोहन दौलत गायकवाड व संतोष दौलत गायकवाड आणि राजू नाथोबा गायकवाड यांच्या शेतातील उसाच्या पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे ऐन दुष्काळात सुमारे 14 लाख 40 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान या शेतकऱ्यांचे झाले आहे. तलाठी जाधव यांनी केलेल्या पंचनाम्याची प्रत तहसीलदार रणजित भोसले यांच्याकडे पाठविली आहे. संबंधित शेतकऱ्यांना प्रशासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी सरपंच व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या