दुष्काळसदृश शिरूर तालुक्याला मिळणार 'या' सवलती

Image may contain: one or more people, people standing, outdoor and nature
शिरूर, ता. 25 ऑक्टोबर 2018: खरीप हंगामात दुष्काळी परिस्थितीच्या निकषाचे ट्रिगर दोन लागू झालेल्या राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले. दुष्काळसदृश तालुक्यांमध्ये शिरूर तालुक्याचा समावेश असून, तालुक्याला सवलती मिळणार आहेत.

यंदा राज्यात सरासरीच्या ७७ टक्के पाऊस पडल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे राज्य सरकारने ट्रिगर वन यासंदर्भात केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे राज्य सरकारने ट्रिगर वन व ट्रिगर टू प्रमाणे १८० तालुके हे दुष्काळसदृश घोषित केले आहेत. या तालुक्यांमधील शेतकरी, विद्यार्थी आदींसाठी आठ विविध प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. याचबरोबर राज्यातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्या आधारावर पीक परिस्थितीचे आकलन समोर येत आहे. यानंतर लवकरच केंद्र शासनाचे पथक येऊन राज्यातील संपूर्ण स्थितीची पाहणी करणार आहे. त्यानंतर हे पथक दुष्काळाशी निगडित मदत जाहीर करेल. राज्य शासनाला अधिकार दिल्याप्रमाणे केंद्राच्या निकषाप्रमाणे दुष्काळसदृश पस्थिती घोषित करून त्याच्या उपाययोजना करण्याचे काम राज्य शासनाने सुरू केले आहे.

उपाय योजना म्हणून या तालुक्यांमध्ये आठ विविध सवलती लागू केल्या असून, जिल्हाधिकाऱ्यांना या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना या सवलतीचा लाभ होणार आहे.

दुष्काळसदृश तालुक्यांमध्ये आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर, वेल्हे यांचा समावेश आहे. मात्र, मावळ, खेड, जुन्नर या तालुक्यांचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या मिळणार सवलती
दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये जमीन महसुलातून सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये ३३.५ टक्के सूट, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदी उपाययोजना जाहीर केल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या