धामारी येथे मोफत फॅशन डिझाईन प्रशिक्षण कार्यक्रम

Image may contain: 8 people, people smiling, people standingधामारी, ता.२६ अॉक्टोबर २०१८(प्रतिनीधी) : महिलांनी जिद्द व चिकाटीने उद्योग व्यवसाय करावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे समन्वयक प्राचार्य रामदास थिटे यांनी केले.

धामारी (ता.शिरुर) येथे जिल्हा उद्योग केंद्र व यशस्वीनी वेल्फेअर फौडशनच्या वतीने महिलांसाठी मोफत फॅशन डिझाईन प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य थिटे बोलत होते.

यशस्वीनी वेल्फेअर फौडेशनच्या सचिव नम्रता गवारे यांनी यावेळी बोलताना सांगितले की महिलांच्या विकासाला चालना देण्यासाठी व त्यांच्यात जिद्द व चिकाटी निर्माण व्हावी या उद्देशाने हा कोर्स सुरू करण्यात आला असून प्रशिक्षणात सहभागी होऊन यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना १ हजार रुपये विद्यावेतनही दिले जाणार आहे. तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी या प्रशिक्षण प्रमाणपत्राचा उपयोग होणार असून शासनाच्या विविध योजनांतून अर्थसहाय्य व कर्ज मिळून देण्यासाठीही यशस्विनी अभियान फौंडेशनच्या वतीने  प्रयत्न करण्यात येतील असेही नम्रता गवारे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास माजी सरपंच सुवर्णा कापरे, कैलास डफळ, सूर्यकांत डफळ, सीमा मोहिते, सविता जाधव, रोहिणी डफळ, अनिता पावसे, रेखा केंजळे, दिपाली डफळ, स्वाती डफळ, सुजाता डफळ आदी उपस्थित होते. सीमा मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या