चैतन्या निकत ची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

मांडवगण फराटा, ता.२७ अॉक्टोबर २०१८(प्रतिनीधी) : मांडवगण फराटा(ता.शिरुर) येथील श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेतील कुस्ती खेळाडू चैतन्या अनिल निकत हिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक एस. टी. गद्रे यांनी दिली.

चैतन्या निकत हिने ताराराणी कुस्ती केंद्र, अकलूज जि. सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या शालेय विभागस्तरीय मुलींच्या कुस्ती स्पर्धेत १९ वर्षांखालील ६८ किलो गटात फ्रीस्टाईल प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला.

चैतन्याची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. चैतन्या व मार्गदर्शक अध्यापकांचे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुकुमार बोरा, उपाध्यक्ष चंद्रकांत बाफणा, शाळा समितीचे अध्यक्ष चंदूलाल चोरडिया, सचिव तु. म. परदेशी, मुख्याध्यापक एस. टी. गद्रे, उपमुख्याध्यापक सुनील थोरात, पर्यवेक्षक रघुनाथ हांडे यांनी अभिनंदन केले.

कुस्ती मार्गदर्शक राजेंद्र कांबळे, क्रीडाप्रमुख दादासाहेब उदमले, मल्हारी उबाळे, सुभाष पाचकर, देवीविजयालक्ष्मी लकडे, बाबासाहेब कोळपे, जय हनुमान व्यायाम शाळा यांनी चैतन्या निकत हिला मार्गदर्शन केले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या