शिरुरच्या आंदोलनकर्त्यांना 'पोलिसी दणका' (Video)

शिरूर, ता.२८ अॉक्टोबर २०१८(प्रतिनीधी) : आंदोलनाला पुर्व परवानगी न घेता व जिल्हा दंडाधिकारी यांचा जमावबंदीचा आदेश जारी असताना शिरुर शहरात आंदोलन करणा-या राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी पोलीसी दणका देत गुन्हे दाखल केले आहेत.
 
सामना या वर्तमानपञात प्रसिद्ध करण्यात आलेल्या मजकुराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 'सामना' दैनिकाची होळी केल्याच्या निषेधार्थ शिरुर शहर शिवसेनेच्या वतीने निषेधाच्या घोषणा देत माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले.
शिरुर शहरात (दि.२७) रोजी सकाळी शिरुर शहर व तालुका युवक राष्ट्रवादीच्यावतीने दुपारच्या सुमारास सामना या वर्तमानपञात प्रसिद्ध करण्यात आलेल्या मजकुराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडुन शिरुर नगरपरिषदेसमोर 'सामना'  दैनिकाच्या निषेधार्थ घोषणा देत सामना वर्तमाञपञांची होळी करण्यात आली होती.

त्यानंतर सायंकाळी शिरुर शहर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिरुर नगरपरिषदेसमोर एकञ येत निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी शिरुर शहर शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे आंदोलन नगरपरिषदेसमोर सुरु असताना शिरुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित नव्हते माञ सायंकाळी शिवसेनेचे आंदोलन सुरु असताना शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके व पोलीस कर्मचारी हजर झाले.वरील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पुर्व परवानगी न घेता व जिल्हा दंडाधिकारी यांचा पुणे जिल्हयात (दि.१७.१०.२०१८ ते ३०.१०.२०१८) पर्यंत मुंबई पोलीस कायदा कलमचा जमाव बंदीचा आदेश जारी असताना सामना पेपरचे दहन केल्या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे मुजफ्फर कुरेशी,सागर निंबाळकर,निलेश पवार,राहिल शेख,हाफिज बागवान आदी कार्यकर्त्यांवर  गुन्हे दाखल करण्यात आले.तसेच शिवसेनेच्या संजय देशमुख, विजया टेमगिरे, मयुर थोरात व इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या