भुजबळ विद्यालयाची बेसबॉल स्पर्धेसाठी राज्यपातळीवर निवड
तळेगाव ढमढेरे, ता.२८ अॉक्टोबर २०१८(प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयातील १९ वर्ष व १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने विभागीय बेसबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
जिल्हा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने आयोजित विभागीय शालेय बेसबॉल स्पर्धा दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत विद्यालयातील १४ वर्ष मुलींच्या संघाने साखळी सामन्यात नगर ग्रामीण, सोलापूर शहर संघाचा पराभव केला. अंतिम सामन्यात पुणे शहर संघाचा ८ - ६ होम रन ने पराभव करत विजेतेपद मिळविले.
या संघात अनुष्का नरके, पायल रासकर, समिक्षा भुजबळ, रूतुजा भुजबळ (कर्णधार ) ज्ञानेश्वरी मुळे, वसुंधरा घोडेकर, वेदश्री भुजबळ, प्रणाली रासकर, स्वराली दरवडे, किशोरी देंडगे, वैष्णवी धनगर, रूतुजा नवनाथ भुजबळ, साक्षी भुजबळ, साक्षी भोरडे, किर्ती दिक्षित, साक्षी गायकवाड आदी खेळाडूंचा समावेश होता. १९ वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने नगर ग्रामीण, पुणे शहर, सोलापूर ग्रामीण या संघाचा पराभव करत विजेतेपद मिळविले.
या संघात प्रतिक्षा वडघुले (कर्णधार), प्रणाली भुजबळ, साक्षी शिंदे, तनुजा झुरंगे, पूनम मारणे, प्रियंका वडघुले, पुजा झेंडे, तेजश्री घाडगे, पुजा गायकवाड, अश्विनी नरके, कोमल पिंगळे, श्वेता गवारी, काजल ढोले, रतिका भुजबळ, अंकिता हंबीर, तृप्ती भोसुरे आदी खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा. ज्ञानेश्वर शितोळे, किरण झुरंगे प्रशिक्षक राजेंद्र हंबीर, आरती गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.