दुचाकीचालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा मृत्यू

Image may contain: outdoorसणसवाडी, ता.२८ अॉक्टोबर २०१८(प्रतिनीधी) : सणसवाडी (ता.शिरुर) येथे ट्रक व टेम्पो यांच्या झालेल्या धडकेत एकजण ठार झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथे भैरवनाथ  मंदिरा समोर शनिवारी पुणे हुन शिक्रापुरच्या दिशेने जाणाऱ्या सिमेंट विटा भरलेला टेम्पो (एम.एच.१४ सी.पी ७८३०) हा रस्त्यावरील एका मोटार सायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात दुभाजक ओलांडून पलिकडे जावून पुणेकडे जाणाऱ्या ट्रक (एम एच १२ सीटी ९४५५) ला जोराने धडकला.

या झालेल्या अपघातात टेम्पो चालक लक्ष्मीकांत सुभाष गुचित (वय. ३५, सध्या रा. तुळापुर, ता. हवेली.  मुळ प. बंगाल) यांच्या आंगावर विटा पडल्याने गंभीर जखमी झाला. खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले.  तसेच टेम्पोमधील दत्तात्रय शिंदे, महेश भरत दवरे, चेतन गोणीया मंहातो हे गंभीर जखमी झाले असून, वाघोली येथे उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पुढील तपास शिक्रापुर पोलीस करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या