बॉक्सिंग स्पर्धेत अथर्व म्हस्केची राज्यस्तरावर झेप

Image may contain: 1 person, standing and closeupशिरूर, ता. 29 ऑक्टोबर 2018 (प्रा. संदीप घावटे): शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील बॉक्सर अथर्व उत्तम म्हस्के याने पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकासह प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

मुळचा पारनेर तालुक्यातील कुरुंद येथील अथर्व म्हस्के हा बोरा महाविद्यालयात इयत्ता बारावी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असून त्याची पुढील महिन्यात मुंबई येथे होणाऱ्या राज्यपातळीवरील शालेय बॉक्सींग स्पर्धेकरीता निवड झाली आहे. अथर्व हा १९ वर्ष वयोगटात व ९१ किलो वजनगटात सहभागी झाला होता. नगर, सोलापूर, पुणे येथील बॉक्सरला पराभूत करून त्याने हे यश मिळवले आहे. तो राज्य स्पर्धेत पुणे विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

त्याला क्रीडा मार्गदर्शक प्रा. नारायण काळे, आस्लम नदाफ यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहीते, कुरूंदचे सरपंच अनिल कर्डीले, पारनेर कारखान्याचे शेतकी अधिकारी उत्तम म्हस्के यांनी त्याचे अभिनंदन करून राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या