पारधी समाज उपोषणाला जाहिर पाठिंबा (व्हिडिओ)

Image may contain: 5 people, people sitting and table
मांडवगण फराटा, ता. 31 ऑक्टोबर 2018 (संपत कारकूड): येथील पारधी समाजाच्या विविध मांगण्यासाठी अमरण उपोषणाला बसलेले पारधी समाजातील कार्यकर्ते हिरालाला रामा भोसले यांना रिपब्लिक जनशक्ती पुणे जिल्हयांच्या वतीने अध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी उपोषणस्थळी येवून जाहीर पाठिंबा दिला आहे.

मंगळवारी (ता. 30) सकाळी 11 वाजता उपोषणाला सुरवात झाली. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून सामाजिक कार्यकर्ते वगळता प्रशासकिय पातळीवरुन अद्याप कोणीही उपोषणाची दखल घेतलेली नव्हती. वेगवेगळया ठिकाणांवरुन समाजातीलच कार्यकर्ते आज उपोषणस्थळी पोचले असून, त्यामध्ये मॅनेजर भोसले, किसन भोसले, शेषराज भोसले (सरचिटणिस पुणे जिल्हा भाजपा), सतिश भोसले, संदिप भोसले, संजय पवार, औंदुबर फटाले, सुरेश भोसले, गोरखनाथ वेताळ, जगदीष गायकवाड, अमोल चैघुले, लालासाहेब भोसले, सागर भोसले, नामदेव काळे, सुफला भोसले इत्यादी कार्यकर्तांनी समर्थन दिले आहे.

मांडवगणमध्ये पारधी समाजच्या मागण्यांसाठी उपोषण
मांडवगण फराटा, ता. 30 ऑक्टोबर 2018 (संपत कारकूड): पिढयान-पिढया गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या आणि मुलभुत गरजांपासून लाखो मैल दुर असलेल्या पारधी समाजाच्या विविध मागण्यांसाठी समाजसेवक हिरालाला भोसले यांनी मांडवगण पोलिस चैकीसमोर अमरण उपोषणाचा मार्ग स्विकारला आहे.

घरची परस्थिती भिक मागून खाण्याची. समाजाविशयी बोलण्याचा एक आणि प्रत्यक्ष पाहण्याच्या वेगळा दुश्टीकोन याचा कडू अनुभव आल्यामुळे आपल्या अनेक वर्षांपासूनच्या गावातील मागण्याच मान्य होत नाहीत, याकडे लक्ष वेधण्यासाठी नाविलाजाने अमरण उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागला. ही हकिगत केवळ माझीच नाही, तर पारधी समाजामधील प्रत्यकाची व्यथा आहे, समाज दुर्लक्षित का आहे? किती दिवस राहणार? असा प्रश्न पडल्यामुळेच उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागल्याचे उपोषणकर्ते हिरालाल भोसले यांनी सांगितले.
 
अगणित समस्यांच्या डोंगराखाली दबलेला पारधी समाज कायम दुर्लक्षित आहे. या समाजाला पुढे घेवून जाणारा नेता व नेतृत्वच मिळाले नाही. स्वतःच्या राहण्याच्या घरांपासून ते दोन वेळेच्या पोटभर अन्नासाठी वाटटेल ते संकट स्विकारण्याची तयारी ठेवून आपले जिवन व्यथित असलेले कित्येक तरुण सध्या भरकटलेले आहेत. त्यांना रुळावर आणण्यासाठी षासकिय योजनांची व लाभाची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे. त्यांचे समपुदेष करण्याची गरज आहे. परंतु, समाज एकसंघ नसल्याकारणांमुळे आजही हा समाज प्रवाहावामध्ये नाही. समाजाची व्यथा जाणून त्यांचा विकासासाठी शासनस्तरावरील उपयायोजना कमी पडताना दिसत आहे.

समाजासाठी विकास महामंडळ करण्यासाठी शासन का विचार करत नाही, असे एक नव्हे अनेक प्रश्न आहेत. एकूण 45 प्रश्न उपस्थित करुन दिनांक 30 ऑक्टोबरला उपोषण चालू करणार आहे. हा प्रश्न केवळ एकटयाचा नाही, तर अल्पसंख्यांक समाजातील प्रत्येक नागरिकांला या समस्येला सध्या तोंड द्यावे लागत आहे. जे जागृत आहेत, तेही ही चळवळी यशस्वी करु शकत नाही, करेंगे या मरेंगे या न्यायाने हे उपोशन व यामगची चळवळ उभी राहत आहे. सरकारी पातळीवर हे उपोषण किती गंभीरतेने घेतेले जाते यावरच या उपोशाचे फलित अवलंबून आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या