ऐका हो ऐका...या वर्षी अपघातांचं प्रमाण झालय कमी

No automatic alt text available.रांजणगाव गणपती, ता.३१ऑक्टोबर २०१८ (सतीश केदारी) : रांजणगाव व शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत गतवर्षीपेक्षा या वर्षी रस्ते अपघातांची संख्या निम्म्याने घटली असुन अपघातातील बळींची संख्या ही घटली आहे.

पुणे जिल्ह्यात रस्ते अपघातात दरवर्षी अनेकांना बळी पडावे लागते.अनेकांचा नाहक जीव जातो.रस्ते अपघातात सर्वाधिक अपघात हे राञीच्या वेळेस होत असतात.तर मद्यप्राशन, चुकिच्या दिशेने जाणे,वेगाचे उल्लंघन करणे,वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे आदी बाबींमुळे गंभीर अपघात होउन अनेकांचा नाहक जीव जात असतो.

याबाबत संकेतस्थळाने घेतलेल्या माहितीनुसार,रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत सन २०१७ मध्ये फेटल अपघात(ज्यात मयत झाले आहेत) असे २७ अपघात झाले असुन ३० जण मयत पावलेले आहेत.गंभीर अपघातांची संख्या १५ असुने ३९ बिगर दुखापतीच्या अपघातांची नोंद झाली असुन २८ जखमींची नोंद झाली आहे.या वर्षी आजपर्यंत च्या मिळालेल्या आकडेवारीनुसार,फेटल १७ अपघातांची नोंद असुन १९ बळी गेले आहेत.८ गंभीर अपघात तर २० बिगर दुखापतींचे अपघात असुन १८ जखमी झाल्याची नोंद आहे.या आकडेवारीत निम्म्याने घट झाल्याचे दिसते.

शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत सन २०१७ मध्ये ४३ फेटल अपघातांची नोंद असुन ४६ जण मरण पावले असुन इतर ५२ अपघातांची नोंद झाली आहे.चालु वर्षी आजपर्यंत २१ फेटल अपघात झालेले असुन २३ जण ठार झालेले आहेत.इतर अपघातांची संख्या ३० इतकी आहे.

गतवर्षीपेक्षा या वर्षी अपघातांचे प्रमाण कमी झाले असुन त्यामुळे अपघातातील मयतांचीही संख्या हि घटली आहे हि बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. तरीही पोलीस कारवाई बरोबरच महामार्गांवर उपाययोजना करणे अद्याप गरजेचे असल्याचे मत काहींनी व्यक्त केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या