राजकीय वरदहस्तामुळेच बेकायदेशीररीत्या वाळूउपसा

Image may contain: sky, tree, plant, outdoor and natureनिमोणे, ता. 31 ऑक्टोबर 2018 (प्रतिनीधी): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात असलेल्या निमोणे येथील पिंपळाचीवाडी येथे गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदेशीररीत्या वाळूउपसा चालू आहे. शिरूरच्या तहसिलदारांनी अनेकवेळा कारवाई करुन देखील राजकीय वरदहस्त असल्यानेच "वाळूसम्राट" घाबरत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. येथे वाळूउपसा करणाऱ्या ठेकेदारांचे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींशी अगदी सलोख्याचे संबंध असल्याने तहसिलदारांवर राजकीय दवाब येत असल्याचे काही नाव न छापण्याच्या अटीवर काही ग्रामस्थांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना सांगितले.
शिरुर तालुक्यातील अनेक भागात वाळूचे ठेके असून यातील कोणत्याच वाळूच्या ठेक्याचा लिलाव झालेला नाही. तरीही दाणेवाडी, पिंपळाचीवाडी येथे दिवसरात्र बेकायदेशीररीत्या वाळू उपसा चालुच असून नदीपात्राची अक्षरशः चाळण झाली आहे. यंदा संपुर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना शिरुर तालुक्यातील घोड धरण मात्र १००% भरले होते.तसेच अजुन आठ महिने धरणातील  पाण्याचं नियोजन करण गरजेचं आहे.परंतु वाळू नदी नदीपात्रात वाळू उपशामुळे मोठे खड्डे पडले असुन उन्हाळ्यात ह्या खड्यात पाणी साठल्यामुळे धरणाच्या खालच्या भागातील लोकांना तीव्र पाणी टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे हा अवैध वाळू उपसा बंद होणे गरजेचे आहे.

घोडनदी पात्रात दाणेवाडी, पिंपळाचीवाडी येथे बेसुमार वाळूउपसा चालु असुन या व्यवसायातले मातब्बर लोक स्थानिक युवकांना हाताशी धरुन रात्रंदिवस वाळू उपसा करत असून पिंपळाचीवाडी येथे घोड नदीपात्रात सुमारे २५ बोटीद्वारे वाळूउपसा करुन त्याचा परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीत मोठया प्रमाणात साठा करुन तो रात्री वाहतुक केला जात आहे. त्यामुळे येथे वाळूसाठी प्रचंड चढाओढ आणि स्पर्धा सुरू झाली असून वाळूच्या ठेक्यासाठीच काही दिवसापुर्वी मारामारीही झाली होती. परंतु इथं एवढा सावळा गोंधळ सुरू असताना सगळ्याच राजकीय पक्षाचे पुढारी मात्र काहीही बोलायला तयार नाहीत. महसुल विभागाने काही दिवसांपुर्वी येथे छापा टाकून कारवाई केली होती. परंतु लगेच दुसऱ्याच दिवशी परत वाळू उपसा चालू झाला.त्यामुळे वाळू उपसा करायला राजकीय वरदहस्त आहे की काय? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

सध्या येथे अनेक शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीत वाळूचे ढिगच ढिग दिसत असून, मोठया प्रमाणात वाळूचा साठा करण्यात येत आहे. शासनाचा एवढया मोठया प्रमाणात लाखो रुपयांचा महसुल बुडत असताना महसुल विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचे अनेक ग्रामस्थांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना सांगितले.

वाळूसम्राटावर तहसीलदारांनी अनेकवेळा कारवाई केली पण त्यांना काहीच फरक पडत नसून, राजकीय वरदहस्त असल्याने परत दुसऱ्याच दिवशी वाळूउपसा चालु होत आहे. तालुक्यातील  सार्वजनिक संपत्तीचा ऱ्हास होत असताना व कोट्यवधी रुपयांचा महसुल बुडत असताना तालुक्यातील लोकप्रतिनिधी व इतर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी गप्प का..? बसले आहेत असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. शिरुर तालुक्याच्या नद्यांची वाळूउपशामुळे चाळण होत असताना रस्त्यांची वाट लागलेली असताना स्वतःच्या राजकीय व आर्थिक फायद्यासाठी सगळ्याच राजकीय नेत्यांनी सध्यातरी "तेरी भी चुप अन मेरी भी चुप" अशीच भुमिका घेतलेली दिसत आहे.

Image may contain: outdoor, nature and water

Image may contain: sky, ocean, cloud, outdoor, nature and water

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या