नेटीझन्सनी टीकेनंतर आमदार तत्काळ उपोषनस्थळी

Image may contain: 8 people, people smiling, people sitting
मांडवगण फराटा, ता. 4 नोव्हेंबर 2018 (संपत कारकूड): शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांना उपोषणापेक्षा वाढदिवस महत्त्वाचा, असे वृत्त www.shirurtaluka.com वर प्रसिद्ध झाल्यानंतर नेटीझन्सनी आमदारांवर टीकेची झोड उठवली. वृत्ताची दखळ घेत आमदार पाचर्णे यांनी तत्काळ आंदोलनकर्तांची भेट घेतली.

फेसबुकवर
www.shirurtaluka.com ने मतचाचणी घेतली होती. शिवाय, संबंधित वृत्त मुख्यमंत्र्यांना ट्विट केले होते. केवळ संकेतस्थळाच्या वृत्तामुळेच आमच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली, असे आंदोलनकर्ते हिरालाल भोसले यांनी संकेतस्थळाशी बोलताना सांगितले. यावरूनच संकेतस्थळाची लोकप्रियता दिसून येते.

दरम्यान, शिरुरचे निवासी नायब तहसिलदार अशोक पाटील, शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, शिरुरचे पोलिस निरिक्षक कैलास घोडके, आरोग्य विभागचे आव्हाड, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शिंदे साहेब यांनी केलेल्या मध्यस्थीला अखेर यश येवून पारधी समाजातील कार्यकर्ते हिरालाल रामा भोसले आणि त्यांच्या कार्यकर्तांमध्ये विविध मागण्यांबाबत चर्चा करुन अखेर समझोता झाल्यामुळे चौथ्या दिवशी दुपारी 3 वाजता हिरालाल भोसले यांनी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते लिंबू-पाणी घेवून आपले उपोषण मागे घेतले.

उपोषणाच्या पहिल्या दिवसांपासून
www.shirurtaluka.com ने हा विषय अत्यंत वस्तुनिष्ट मांडला होता. उपोषणावर बारीक नजर ठेवून 46 मागण्यांशी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच गावातील कारभारी उपोषण कसे हाताळतात यावर लक्ष ठेवले होते. वरच्या पातळीवर उपोषण बेदखल व दडपण्याबाबत खलबते सुरु झाली होती. तिसऱया दिवशी प्रकृत्ती खालवल्यानंतर उपोषणकर्ताला उचलून ससून रुग्णालयाचा रस्ता दाखविण्यासाठी शिरुर पोलिस प्रशासनाने प्रयत्नही केले. कार्यकर्ता एकदम सामान्य घरातील होता. परंतु. त्याच्या मागण्या मात्र रास्त होत्या. उपोषणामधील मागण्या गावच्या राजकारणावर विपरित परिणाम करतील याची जाणीव उशिरा का होईना लोकप्रतिनिधींना झाली आणि अखेर चैथ्या दिवशी तालुक्याचे आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यासह निवासी नायब तहसिलदार अशोक पाटील, शिरुरचे पोलिस निरिक्षक कैलास घोडके यांनी उपोषणस्थळावर येवून उपोषणकर्तांशी सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. मांगण्यांबाबत संबंधित नऊ विभागाला लेखी पत्र काढून चौकशी करुन त्याचा अहवाल पाठविण्याबाबत कळविले असून, ग्रामपंचायत स्तरावरील सर्व मागण्यां गावामध्येच विशेष ग्रामसभा बोलावून त्यामध्ये सर्व विषय वाचून चर्चा करुन ठराव करण्याचे लेखी आदेश देण्यात आल्यामुळे अखेर उपोषण मागे घेण्यात आले.

पारधी समाजाला विविध मांगण्यासाठी पहिल्या दिवसांपासून अखेरपर्यंत साथ देणाऱयांमध्ये शेषराज भोसले, शेराबानू काळे, औंदुबर फटाले, राजेंद्र कांबळे, रिपब्लिकन जन-शक्तीचे शैलेंद्र मोरे आणि त्यांचे युवक अध्यक्श-किसन (माऊली) रामा भोसले, रामा रोजनदार भोसले, मॅनेजर भोसले, सतिश भोसले, संजय पवार, तुषार पवार, संदीप भोसले, रुखेश भोसले, गोविंद भोसले, किशोर शिंदे, सुमन किशोर शिंदे, नंदू पवार, किसन भोसले, सार्जन पवार, श्रीमंत भोसले, बारामतीचे पारधी समाजाचे लालासो भोसले, नामदेव काळे, अमोल काळे, बाळू काळे, सुफला भोसले, बिभिशण चव्हाण इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


आमदार पाचर्णे यांना उपोषणापेक्षा वाढदिवस महत्त्वाचा
मांडवगण फराटा, ता. 1 नोव्हेंबर 2018 (संपत कारकूड):  शिरुर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या उपस्थितीत मांडवगण फराटा येथील माऊली मंदिरात वाढदिवसानिमित्त कार्यक्रम चालू होता. येथून हाकेच्या अंतरावरच उपोषणकर्ते उपोषणाला बसलेले होते. परंतु, उपोषणाबाबत साधी चौकशीही त्यांनी केली नाही. उपोषणापेक्षा त्यांना वाढदिवस महत्वाचा आहे, असे उपोषणकर्ते हिरालाल भोसले व त्यांच्या कार्यकर्तांनी आमच्या प्रतिनिधींला सांगितले.

येथील पारधी समाजाच्या वतीने सुरु असलेले उमरण उपोषणाला प्रशासकिय पातळीवर अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे हे उपोषण बेदखल होत असल्याचे उपोषणकर्तांनी सांगितले. उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. ग्रामपंचायत मांडवगण फराटा, प्रचायत समिती स्तरावरील गंभीर भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी तसेच पोलिस चौकीच्या बाजूला असलेल्या बेकायदेशीर मटका व्यवसाय त्वरित बंद करावा, तसेच पारधी समाजातील घरकुलांच्या जागेचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, या प्रमुख मागण्या घेवून दिनांक 30 तारखेला पारधी समाजातील हिरालाल रामा भोसले यांनी अमरण उपोषण सुरु केले आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्यावतीने अद्याप कोणीही जबादार व्यक्ती पुढे येवून उपोषणाबाबत साधी चौकशीही केलेली नाही. दरम्यान, मांडवगण फराटाचे तलाठी घोडके आणि मंडल अधिकारी पी. पी. केदारी यांनी उपोषणस्थळावर येवून उपोषणाविषयी माहिती जाणून घेतली. दोन्ही अधिकारी नवीन असलेमुळे त्यांनाही नेमका काय निर्णय घ्यावा ते समजलेले नाही. एकंदर उपोषणाबाबत सर्वच बाजूने कोणतीही हालचाल दिसून आली नाही.
 
हार नही मानुंगा !
उपोषणावर ठाम असून मागण्यांवर प्रशासकिय पातळीवरील जबाबदर व्यक्तींकडून चर्चा व लेखी पत्र घेतल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असे हिरालाल भोसले यांनी सांगितले. मी जिवंत असूनही रोज मेल्यासारखा जगत आहे. तेव्हा उपोषण स्थळावरच माझे काही बरे वाईट झाले तरी मी मागे हाटणार नाही, उपोषणाची सर्व जबाबदारी माझया मागण्याच्या संबंधित खात्यावरच असेल असेही त्यांनी उदीग्न होऊन सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या