अंध बापाचा जीव तळमळतोय मुलाच्या उपचारासाठी ...

Image may contain: textशिरूर, ता. 5 नोव्हेंबर 2018: हातवरचे पोट... रोंजदारी करून पोटाची खळगी भरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही... कामावर निघालेल्या मुलाच्या दुचाकीला अपघात होतो अन् क्षणात अंधार पसरतो. घरात एक दमडी नाही. मुलाला अपघात झाल्याचे समजल्यानंतर अंध असलेल्या बापाचा जीव मुलाच्या उपचारासाठी अक्षरशः तळमळतोय...

दत्तात्रेय केदारी (रा. शिरसगाव काटा, ता. शिरूर, जि. पुणे) हे शंभर टक्के अंध. चार एकर जमीन. जिरायती. पाऊस पडला तरच पिकते. कुटुंबाचा गाडा हाकताना अनेकदा पोटाला चिमटे घ्यावे लागता. दोन मुलगे. त्यापैकी एक दीपक रोजंदारी करून उदरनिर्वाह चालवतात तर सतीश हे पत्रकार. घरची आर्थिक परिस्थिती अतीशय नाजूक. दीपक हे कामासाठी सायंकाळी दुचाकीवरून घराबाहेर पडले. दुचाकीसमोर अचानक कुत्रे आडवे आले अन् ते उडून एका दुभाजकावर जाऊन पडले. मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला... अपघात झाल्याची माहिती समजल्यानंतर सतीश यांनी भावाला उपचारासाठी तत्काळ शिरूर येथील बाबूरावनगरमधील श्री गणेशा रुग्णलयात दाखल केले.

डोक्यात रक्तस्त्राव झाल्यामुळे तत्काळ शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. श्री गणेशा रुग्णालयाचे डॉक्टर अखिलेश राजूरकर यांना केदारी यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीची जाणीव होतीच. त्यांनी क्षणाचाही विचार न करता तत्काळ उपचार सुरू केले. काही शस्त्रक्रियाही केल्या... दीपक हे अद्यापही बेशुद्धावस्थेत आहेत. यापुढेही काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. अपघात झाल्यानंतर काही वेळात रुग्णालयात दाखल केल्यामुळे दीपक यांचा जीव वाचू शकला. परंत, पुढील उपचारासाठी पाच लाख रुपयांची आवश्यकता आहे. दीपक यांना दोन मुली तर आठ महिन्यांचा मुलगा आहे. वडील अंध. कुटुंबाचा गाडा दीपक यांनाच हाकावा लागतो. ऐन सणासुदीत दीपक हेच रुग्णालयात असल्यामुळे कुटुंबावर मोठे संकंट कोसळले आहे.

शिरूर तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी तत्काळ मदत देऊ केली आहे. पंरतु, उपचारासाठीचा आकडा मोठा आहे. दीपक यांच्या वडिलांचा जीव अक्षरशः तळमळतोय.. खिशात एक पैसाही नाही. मुलावर कसे उपचार होतील, त्यासाठी पैसा आणायचा कोठून याची चिंता बापाला लागली आहे. आपला मुलगा कधी शुद्धीवर येऊन दोन शब्द कानावर पडतील असे त्यांना झाले आहे. अंध बापाला मुलाचा आवाज ऐकायचाय, यासाठी आपल्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. आपल्या मदतीमुळे दीपक यांचा आवाज नक्कीच वडील ऐकू शकतील...

ऑनलाइन मदतीसाठी-
Satish  Dattatray kedari
Mobile no. 88050 45495
Bank Account no : 60279696636
BANK Name : Bank of Maharashtra
IFSC CODE : MAHB 0000740
MICR CODE : 412014008
Branch : VADGAON RASAI (740), Shirur, Pune.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या