बंधारा कोरडा पडल्याने पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत

Image may contain: grass, outdoor and nature
तळेगाव ढमढेरे, ता. 6 नोव्हेंबर 2018 (एन. बी. मुल्ला): तळेगाव ढमढेरे येथील वेळ नदीवरील भैरवनाथ बंधारा कोरडा पडल्याने पाण्याची भिषण समस्या निर्माण झाली आहे. चासकमानचे पाणी डाव्या कालव्याबरोबरच वेळ नदीतून नियोजनबध्दरीत्या सोडण्याची व सर्व बंधारे भरून घेण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

तळेगाव ढमढेरे येथील भैरवनाथ बंधारा कोरडा पडल्याने तिव्र पाणी टंचार्इचा सामना करावा लागत आहे. चासकमानचे आवर्तन वेळेवर सोडले तरच वेळ नदीला पाणी सुटते व बंधारे भरले जातात. मात्र, वेळ नदीतून नियोजनबध्दरीत्या पाणी सोडलेले नसल्याने हे बंधारे कोरडे पडले आहेत. तळेगाव ढमढेरे येथील नळ पाणी पुरवठा योजना भैरवनाथ बंधाऱयावर अवलंबून आहे. मात्र बंधाऱयातच पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याची तसेच दुय्यम वापरासाठी आवश्यक पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. बंधारा भरल्यानंतर सुमारे तीन आठवडयाचा पाण्याचा प्रश्न सुटतो. पिण्याच्या पाण्याची समस्या तर तळेगावकारांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. बऱयाच वेळा येथील नागरीकांना पिण्याचे पाणी विकतच घ्यावे लागते. चालू वर्षी पावसाळा पूर्ण कोरडा गेल्याने व शिरूर तालुक्याला पाचसाने वारंवार हुलकावणी दिल्याने पाणी टंचार्इ जाणवत आहे, त्यामुळे वेळ नदीतून चासकमानचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

वेळ नदीतून चासकमानचे पाणी सोडल्यास किमान महिनाभराचा पाण्याचा प्रश्न सूटणार असून, नदी काठच्या गावांना शेतीसाठी देखील हे पाणी उपयुक्त ठरणार आहे. धरणातील उपयुक्त पाण्याच्या साठयाचा विचार करता चालू वर्षी भिषण दुष्काळी परीस्थिती व पाणी टंचार्इस सामोरे जावे लागणार असल्याने पिण्याच्या पाण्यास प्राधान्य देवून वेळ नदीवरील बंधारे नियोजनबध्दरीत्या ठरावीक कालावधी नंतर भरून घ्यावेत, अशी मागणी देखील परीसरातील नागरीकांनी केली आहे. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने पिण्यासाठी पाणी चिकतच घ्यावे लागत असल्याने परीसरात पाणी विक्रीचा व्यवसाय मात्र तेजीत असल्याचे चित्र असून हंडाभर पाणी 10 ते 20 रूपयांना विकत घ्यावे लागते. प्रशासनाने पाणी समस्येकडे गांभीर्याने लक्ष देवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणीही परीसरातील नागरीकांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या