सैनिकाच्या घरी सनईचैघडा वाजवून दिवाळी साजरी

Image may contain: 11 people, people standing
निमगाव म्हाळुंगी, ता. 13 नोव्हेंबर 2018 (एन.बी. मुल्ला): येथे समस्त हिंदू आघाडी आणि शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबिया समवेत दिवाळी साजरी करण्यात आली.

शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब काळे यांच्या प्रयत्नातून पुणे शहर आणि शिरूर तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सैनिकांच्या घरी पहाटेच्या आनंदी वातावरणात नगारा वादन करून, दारावर तोरणे बांधून, दारात रांगोळी काढून व पणत्या लावून आनंदात सैनिकांच्या कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी मेजर दत्तात्रय घोलप, संतोष कांबळे, भरत काळे, विजय शिवले, दत्तात्रय घोलप, राजू घोलप, अविनाश कर्पे, कैलास काळे, संतोष साठे, महेंद्र चव्हाण, संभाजी चौधरी, शांताराम दौंडकर, सुधाकर कुसाळे, संजय दौंडकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मेजर दत्तात्रय घोलप म्हणाले की, नागरिकांच्या मनात सैनिकविषयी आदराची भावना असणे आवश्यक आहे. सैनिकांच्या कुटुंबा समवेत दिवाळी साजरी करण्याचा हा स्तुत्य उपक्रम असून संपूर्ण भारतभर असा उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.


Image may contain: 10 people, people smiling, people standing
सादलगाव, ता. 7 नोव्हेंबर 2018 (संपत कारकूड): देशाच्या सीमेवर कर्तव्याची जाबाबदारी उचलणाऱया सैनिकाच्या कुंटबाबरोबर घरी जावून दिवाळी साजरी करुन समाजामध्ये नवा संदेश देण्याचा उपक्रम समाजसेवक नंदकुमार रमाकांत एकबोटे आणि त्यांच्या मित्रांनी सामाजिक भावनेतून केला आहे.

धामारी (ता. शिरुर) येथील सैनिक तुकाराम ढफळ गेली 17 वर्षांपासून लष्करी सेवेमध्ये आहेत. त्यांच्या कुटुंबात वयोवृध्द आई, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. देशसेवा हे आपले प्रथम कर्तव्य आहे. ते करत असताना घरी सणासुदीला आपण नाही, म्हणुन घरच्यांची दिवाळी कशी होत असेल? याची चिंता विसरुन कर्तव्य हीच दिवाळी. परंतु सैनिकांची ही खंत आणि उणीव हेरुन तुकाराम ढफळ यांच्या घरी दिवाळीच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे जाऊन रांगोळी काढून त्यांच्या कुंटाबाला मिठाई दिली. त्यांच्यासोबत सनई चौघडयाच्या मंगलमय वातावरणात दिवाळी साजरी करण्याचा अभिनव उपक्रम दिवाळीच्या पहिल्या दिवशी पार पडला आहे.

पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार एकबोटे, बापू काळे, सनई चौघडा वाजविणारे प्रविण आढाव, जय जवानची रांगोळी साकारणारे कुंदनजी तोडकर या सर्वांनी मिळून जवानाच्या घरी दिवाळी साजरी केली. गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम चालू असून, सैनिकांच्याप्रती असलेले प्रेम व सामाजिक बांधिलकेतून हा उपक्रम करीत असल्याचे वरील सर्वांनी सांगितले.

शिरुर तालुक्यातून अनेक जवान लष्करी सेवेमध्ये आहेत. सर्वांनाच दिवाळीमध्ये घरी सुटटी मिळत नाही. लष्करात राहूनही आपल्या तालुक्यावर प्रेम करणारे आणि तालुक्याच्या सर्व राजकिय, सामाजिक घडामोडीवर लक्ष ठेवून सर्वांशी सुसंवाद साधून आपला प्रभावी यशस्वी संबंध प्रस्थापित करण्यामध्ये पटाईत असलेले जवान तुकाराम ढफळ तालुक्यात प्रसिध्द आहेत. तालुक्याच्या कानाकोपऱयामध्ये त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. आपली लष्करातील नोकरी संभाळून प्रत्येक सणवाराला सर्वांना शुभेच्छा देवून खुशाली घेणारे म्हणून ते प्रसिध्द आहेत.

सैनिकांच्या हस्ते प्रत्येक गावामध्ये एकदा तरी झेंडा वंदनाचा मान मिळावा, यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असतो. निवृत्तीनंतर सामाजिक कामात झोकून देणार, अशी त्यांची भावना असल्याचे दिवाळीनिमित्त त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी आपली भावना बोलून दाखविली. अशा सर्व आजी-माजी सैनिकांना www.shirurtaluka.comच्या टीमकडून दिवाळीच्या ‘हार्दिक शुभेच्छा’!.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या