खासदारांनी दत्तक घेतलेल्या रस्त्याची दुरावस्था...

Image may contain: tree, sky, outdoor and nature
कासारी, ता. 14 नोव्हेंबर 2018: सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी दत्तक घेतलेल्या गावातील रस्त्याची दुरावस्था झाली असून, तालुक्यातील इतर रस्त्यांचे तर बोलायलाच नको, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

पुणे-नगर महामार्गावरील कासारी फाटा ते कासारी गाव या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे. सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी हे गाव दत्तक घेतले आहे, मात्र या गावाशी जोडल्या गेलेल्या सर्वच रस्त्याची दुरावस्था झाली आहे.

कासारी फाटा ते कासारी गाव या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. कासारी येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकलवरून जाताना कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वारांनाही या रस्त्याने प्रवास करणे जिकीरीचे होत आहे. पुणे-नगर महामार्गाला जोडणारा हा मार्ग असल्याने या रस्त्यावरून शेत मालाची व दुधाची वाहतुक मोठया प्रमाणात होते. रस्त्याच्या सार्इडपट्यायाही तुटल्याने वाहतुकीस मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होतो. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावाच्या रस्त्याची ही अवस्था असेल तर तालुक्यातील इतर रस्त्यांबाबतीत बोलायलाच नको. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्यांबाबत सोशल मीडियावरून नेटीझन्सनी टीका सुरू केली आहेत. मात्र, यावर काहीही परिणाम होताना दिसत नाही. शिरूर तालुक्यातील रस्त्यांवर कोणाचे लक्ष आहे की नाही? असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या