शिरूर तालुक्यात थंडीमुळे हुडहुडी; शेकोटया पेटल्या

शिरूर, ता. 17 नोव्हेंबर 2018: शिरूर तालुक्यात थंडीची तिव्रता वाढल्याने ग्रामीण भागात सर्वत्र शेकोटया पेट लागल्या असून, लहान थोर मंडळी पहाटे पासूनच शेकोटया करून गप्पा मारताना दिसत आहेत.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने हुडहुडी भरविणारी थंडी आता जाणवू लागली आहे. शिरूर तालुक्यात सर्वत्रच थंडीचा कडाका वाढला असून पारा घसरल्याने हुडहुडी भरली आहे. थंडीपासून बचावासाठी शेकोटयांचा आधार घेतला जात आहे. बाजारपेठेमध्ये देखील थंडीमुळे स्वेटर, मफलर, कानटोप्या व शाल यांची मागणी वाढली आहे.

बंगालच्या उपसागरातील ‘गज’ चक्रीवादळ शुक्रवारी तमिळनाडूच्या पश्‍चिमेकडे घोंगावत आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असून, ते अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट, तर कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत किंचित घट झाल्याचे निदर्शनास आले. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान शनिवारी (ता. १७) कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. तर कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात रविवार (ता. १८) ते मंगळवार (ता. २०) दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाल्याचे दिसून आले. पुणे (११.८), जळगाव (१२), सांगली (१४.२) आणि सातारा (१४.४) येथे १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नोंदविले गेले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या