आलेगाव पागात अनधिकृत वाळूच्या दोन बोटी उद्‌ध्वस्त

आलेगाव पागा, ता. 18 नोव्हेंबर 2018: आलेगाव पागा येथील भीमा नदीपात्रात अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या दोन डिझेल बोटी महसूल विभागाच्या पथकाने जिलेटिनच्या मदतीने उद्‌ध्वस्त केल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार रणजित भोसले यांनी दिली.

अनधिकृत वाळू चोरीबाबात www.shirurtaluka.com ने अनेकदा वृत्त व्हिडिओसह प्रसारीत केले आहे. राजकीय वरदहस्तामुळेच बेकायदेशीररीत्या वाळूउपसा होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून आलेगाव परिसरातील भीमा नदीपात्रात एकाही भूखंडाचा लिलाव झाला नाही. मात्र तरीही आलेगाव परिसरातील वाळूचोरांनी धुमाकूळ घालत वाळू उपसा सुरू ठेवला आहे. प्रामुख्याने वाळूचोर स्थानिक असल्यामुळे त्यांची परिसरात दहशत आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार महसूल खात्याकडे तक्रारी केल्या होत्या. तहसीलदार भोसले यांनी कारवाईसाठी पथक तयार केले व त्यानुसार मंडलाधिकारी मनीषा खैरे, नीलेश घोडके, तीर्थगीरी गोसावी, कामगार तलाठी गोरक्षनाथ इंगळे, कोतवाल संतोष चव्हाण, सागर औचिते यांच्यासहित नदीपात्रात छापा टाकला व अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी उद्‌ध्वस्त केल्या. या वेळी वाळूचोरांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले. नदीकाठी असणाऱ्या अडचणीतून मार्ग काढीत महसूल पथकातील कर्मचाऱ्यांनी इतर ठिकाणी वाळू उपसा सुरू आहे का? याची पाहणी केली.

वाळूचोरांवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार भोसले यांनी दिली. मात्र, बेकायदेशीररीत्या वाळूउपसा करणाऱयांना राजकीय वरदहस्त लाभत असेल तर खरंच गुन्हा दाखल होईल का? आणि बेकायदेशीर वाळू उपसा थांबेल का? हा खरा प्रश्न आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या