मराठा समाजाला आरक्षण ही काळाची गरज: प्रदीप कंद

न्हावरे, ता. 20 नोव्हेंबर 2018: मराठी समाजाची अवस्था पाहता समाजाला आरक्षण मिळणे ही काळाची गरज बनली आहे. सरकारने अंत न पाहता व फक्त शब्दांतून घोषणा न करता प्रत्यक्षात कृतीतून मराठा समाजाला आरक्षण लागू करावे,'' अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केले.

मराठा आरक्षणासाठी संवाद यात्रेचे शिरूर तालुक्‍यातील न्हावरे येथे स्वागत करण्यात आले. यावेळी सभेत कंद बोलत होते. "मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठी समाजाने शांततेत 58 मोर्चे काढले. त्याची जगाने दखल घेतली मात्र सरकार समाजाची दिशाभूल फसवणूक करीत आहे, असे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र कोरेकर म्हणाले.

यावेळी मराठा संवाद यात्रेचे समन्वयक शांताराम कुंजीर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव कोरेकर, घोडगंगाचे माजी संचालक पांडुरंग थोरात, शोभना पांचगे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवक अध्यक्ष सागरराजे निंबाळकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव घावटे, माजी सरपंच गौतम कदम, माजी उपसरपंच अरुण तांबे, आबासाहेब कांडगे, रमेश देशमुख आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या