बुरुंजवाडीकरांचा कचरा डेपोला विरोध तर...

बुरुंजवाडी, ता. 21 नोव्हेंबर 2018: शिक्रापूरच्या नियोजित कचरा डेपोला विरोध करण्यासाठी बुरुंजवाडी ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन आंदोलनाचा इशारा दिला तर कचरा डेपोला कितीही विरोध केला, तरी कचरा प्रकल्प ठरलेल्या जागेवरच होईल, असे शिक्रापूरच्या सरपंचांनी सांगितले.

शिक्रापूरच्या कचरा डेपोच्या जागेसाठी शिक्रापूर ग्रामपंचायतीने हिवरे रस्त्याला व्यंकटेश कृपा साखर कारखान्याजवळ जागा निवडली होती. ही जागा बुरुंजवाडीच्या हद्दीत असल्याने या जागेवर आक्षेप घेत सरपंच पूनम टेमगिरे यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. याबाबत शिक्रापूरच्या सरपंच जयश्री भुजबळ यांनी टेमगिरे यांची भूमिका राजकीय असल्याचा तसेच शिक्रापुरातील बुरुंजवाडीकरांच्या कचऱ्याबाबत ठोस भूमिका घेण्याचा इशारा दिला. त्यानंतर बुरुंजवाडीत सोमवारी तातडीने ग्रामसभा घेत शिक्रापूरच्या नियोजित कचरा डेपोला विरोध करण्याचा ठराव संमत केला. बुरुंजवाडी ग्रामस्थांनी सोमवारी (ता. 20) ग्रामसभा घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. या ग्रामसभेचा ठराव जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना पाठविला आहे.

बुरुंजवाडीच्या सरपंचांसह तेथील काही पदाधिकाऱ्यांचा कचरा प्रक्रिया प्रकल्पाला असलेल्या विरोधाबाबत आम्ही माहिती आहे. कचरा डेपोला कितीही विरोध केला, तरी कचरा प्रकल्प ठरलेल्या जागेवरच होईल, असे शिक्रापूरच्या सरपंच जयश्री भुजबळ यांनी सांगितले.

ग्रामसभेला माजी सरपंच बाळासाहेब टेमगिरे, विनोद टेमगिरे, विलास नळकांडे, लता टेमगिरे, ग्रामपंचायत सदस्या सोनाली टेमगिरे, मेघा नळकांडे, हिराबाई टेमगिरे, अमोल रुके, सोसायटीचे अध्यक्ष अनिल टेमगिरे, नवनाथ नळकांडे, दत्तात्रेय टेमगिरे तसेच पिंपळे धुमाळ, पद्मावती वस्ती, गणेगाव खालसा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या