मनपा भवन ते तळेगाव ढमढेरे बससेवा पुन्हा सुरू...

तळेगाव ढमढेरे, ता. 25 नोव्हेंबर 2018: 'मनपा ते तळेगाव ढमढेरे बससेवा अचानक बंद' झाल्याचे वृत सर्वप्रथम www.shirurtaluka.comने प्रसिद्ध केल्यानंतर मतचाचणी, ट्विट व प्रवाशांच्या इशाऱयानंतर बससेवा पुन्हा पुर्ववत करण्यात आली आहे.

मनपा ते तळेगाव ढमढेरे बससेवा अचानक बंद झाल्यानंतर संकेतस्थळाने सर्वप्रथम वृत्त प्रसारित केले होते. शिवाय, या वृत्ताचे ट्विट पीएमएमएलच्या वरिष्ठांबरोबरच आमदार बाबुराव पाचर्णे व मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवले होते. शिवाय, फेसबुकवर मतचाचणी घेण्यात आली होती. ही बससेवा अचानक बंद करणे चुकीचे असल्याचे 87 टक्के नेटिझन्सनी म्हटले होते.

शनिवारपासून ही बससेवा पुन्हा पुर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.मनपा ते तळेगाव ढमढेरे बससेवा अचानक बंद
Image may contain: outdoor

तळेगाव ढमढेरे
, ता. 22 नोव्हेंबर 2018:
महानगरपालिका भवन (मनपा) ते तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) अशी 159 क्रमांकाची बससेवा अचानक बंद झाल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या मार्गावरील बससेवा पुन्हा सुरू झाली नाही तर आंदोलनाचा मार्ग पत्कारावा लागले, अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.

मनपा ते तळेगाव ढमढेरे ही बससेवा अनेक वर्षांपासून सुरळीत आहे. या बसमुळे प्रशासनाला उत्पन्नही चांगले मिळत आहे. मात्र, पीएमपीएमएलच्या प्रशासनाने मंगळवारपासून (ता. 20) अचानक बंद केल्याने दैनंदिन प्रवाशांची गैरसोय झाली असून, पूर्वीप्रमाणे मनपा ते तळेगाव ढमढेरे आणि तळेगाव ढमढेरे ते मनपा अशी बससेवा पुन्हा पूर्ववत करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मनपा ते तळेगाव ढमढेरे अशी बससेवा सुरू आहे. परंतु, पुन्हा तळेगाव ढमढेरे ते वाघोली पर्यंतच बससेवा सुरू आहे त्यामुळे वाघोलीवरून प्रवाशांना दुसऱया बसमधून मनपापर्यंत प्रवास करावा लागत आहे. याप्रकारामुळे दैनंदिन प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तळेगाव ढमढेरे ते मनपा भवन असा प्रवास करणारे अनेक वृद्ध व अपंग प्रवासी आहेत. या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या बसमधून कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर ते तळेगाव ढमढेरे येथील विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार असे दैनंदिन प्रवासी प्रवास करतात. या सर्वांची गैरसोय झाली आहे.

मनपा ते तळेगाव ढमढेरे आणि पुन्हा तीच बस तळेगाव ढमढेरे ते मनपा अशी पूर्ववत सुरू करावी, अशी आग्रही मागणी प्रवाशांनी केली आहे. तळेगाव ढमढेरे ते मनपा अशी बससेवा बंद करण्याचा उद्देश काय? या संदर्भात पीएमपीएमएलच्या प्रशासनाशी कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या