वडगाव रासाईत चोरी करणारे सीसीटीव्हीत कैद

Image may contain: outdoor
वडगाव रासाई, ता. 24 नोव्हेंबर 2018: येथील तळई माळ येथे उभ्या असलेल्या एका मोटारीच्या काचा फोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांची चोरी केल्याची घटना गुरुवारी (ता. 22) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे.

मांडवगण फराटा येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमराज भगवान खुळे (रा.नागरगाव ता. शिरुर) यांनी फिर्याद दिली आहे. खुळे यांनी जमीन खरेदीसाठी गावातील मित्रांकडून हात उसने साडे तीन लाख रुपये जमा केले होते. कुटुंबियांना घेऊन ते शिरुर येथे जमीन खरेदी करण्यासाठी गेले होते. सर्व काम संपल्यावर सायंकाळी ते सासरे मोहन बाजीराव ढवळे (रा. वडगाव रासाई ता.शिरुर) यांना तळई माळ येथे घरी सोडण्यासाठी इटीव्हास MH 12 QT 6575 या चार चाकी मोटारने गेले होते. यावेळी त्यांनी सासरे ढवळे यांचेकडे आपल्याकडील काळ्या रंगाच्या बॅगमधील एक लाख रुपये दिले, व उर्वरीत अडीच लाख रुपये पुन्हा बॅगमध्ये ठेऊन ती बॅग मोटारमध्ये सीटवर ठेवली होती. यावेळी ते चहा पीत असताना गाडीच्या काचा फोडून अज्ञात चोरट्यांनी ही रक्कम घेऊन पोबारा केला.

चोरी करणारे चोरटे काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकी वरून आले होते. एकजण उंच तर दुसरा बुटका असे हे चोरटे आहेत. सदर चोरटे आंधळगाव येथील एका पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पुढील तपास शिरूरचे पोलिस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आबासाहेब जगदाळे, बाळासाहेब खोमणे, अशोक तारु, अक्षय काळे हे करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या