करडेमधील कुस्ती प्रेमिंनी आखाडा पाहिला Live

Image may contain: one or more people, people playing sports, crowd and outdoor
करडे, ता. 26 नोव्हेंबर 2018 (तेजस फडके): येथील यात्रेनिमित्त कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. www.shirurtaluka.com ने हा आखाडा Live केल्यामुळे हजारो कुस्तीप्रमींना घरबसल्या हा आखाडा पाहता आला.

"येळकोट येळकोट जय मल्हार" भैरवनाथाच्या नावाने चांगभलंच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात करडे (ता.शिरुर) येथील ग्रामदैवत भैरवनाथाची  यात्रा त्रिपुरारी पौणिमेच्या मुहूर्तावर दि २२ व २३ रोजी मोठया भक्तीभावात पार पडली.

गुरुवार (ता. 22) सकाळी ११ वा.पंडित बाळासाहेब वाईकर यांच्या सुश्राव्य संगीत भजनाचा कार्यक्रम, त्यानंतर रात्री ८ वा देवाची पालखी मिरवणुक आणि रात्री १० वा. रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पार पडला.

शुक्रवार (ता. 23) दुपारी ३ ते ६ कुस्यांचा जंगी आखाडा पार पडला.यात सुमारे ५०० मल्लांनी भाग घेतला.यात सुमारे ५०० ते ११००० रुपया पर्यंतच्या कुस्त्या पार पडल्या.यंदा करडे गावात पैलवानांच्या कुस्त्या ह्या वजन गटानुसार पार पडल्या. यावेळी अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, शिरुर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, हे उपस्थित होते. यावेळी पंच म्हणुन मधुकर रोडे, बाळासाहेब घायतडक, फक्कड रोडे, पोपट लंघे यांनी काम पाहिले. यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या