कासारी येथे डंपरने धडक दिल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

Image may contain: 1 person, closeupशिक्रापूर, ता. 28 नोव्हेंबर 2018: कासारी येथे डंपरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेली साक्षी कैलास सातपुते ही विद्यार्थिनी जागीच ठार झाली तर दुचाकी चालक रवींद्र सुखदेव काळकुटे हा जखमी झाला आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्यात यासंदर्भात मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे वडील कैलास सदाशिव सातपुते वय (३९, रा. कासारी, ता. शिरूर, जिल्हा पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्यातून व घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 27) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास अपघात घडला. साक्षी कैलास सातपुते व फिर्यादीचा भाचा रवींद्र सुखदेव काळकुटे हे कासारी येथील सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात शिकत असून, साडेचार वाजता शाळा सुटल्यानंतर हिरो होंडा स्प्लेंडर प्लस  दुचाकी (क्रमांक  एम एच १२ जेपी ११८३) वरून घरी जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या डंपरने (क्रमांक  एम एच १२ एफ डी ६३४४) दुचाकीला धडक दिली. साक्षी सातपुते ही दुचाकीवरून खाली पडून डोक्याला जबर मार लागल्याने ती जागीच ठार झाली. दुचाकी चालक रवींद्र सुखदेव काळकुटे हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर डंपर चालक फरार झाल्याने नाव समजू शकले नाही. शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार हे पुढील तपास करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या