सादलगावची चावडी पहायला मिळणार आता नव्या रुपात

सादलगाव, ता. 29 नोव्हेंबर 2018 (संपत कारकूड): येथील जुन्या काळात बांधलेल्या आणि सध्या मोठया प्रमाणात पडझड झालेल्या बहुजन समाज मंदिरासाठी 70 हजार रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.

केंद्राकडून दिल्या जाणाऱया 14 व्या वित्त आयोगाच्या आराखडयामध्ये तिसऱया वर्षी या कामाची तरतूद करण्यात आली होती. गावच्या जुन्या वैभवाची साक्ष असणारी चावडी आता नव्या रुपात ग्रामस्थांना पाहण्यास मिळणार आहे. या ठिकाणी मोठया प्रमाणात बहुजन समाज श्रमपरिहार व विश्रांतीसाठी बसत असत. आजही गावातील नवीपिढी या ठिकाणी संध्याकाळी आपल्या मित्रांबरोबर एकत्र गप्पागोष्टी एकत्र येतात. जुन्या काळातील या चावढीची अत्यंत दुरुवस्था झाली होती. याकडे गेली चाळीसवर्षांत कुणीही लक्ष दिले नव्हते. परंतु 14 व्या वित्तआयोग आराखडयात येथील एका जानत्या सामाजिक कार्यकर्ताने हे समाजमंदिर दुरुस्तीचा आग्रह धरला होता. अगोदार ही चावडी पुर्ण बांधकाम करण्याची मागणी होती. परंतु, खर्चाचे मोठे बजेट सध्या शक्य नसल्यामुळे याची सध्या दुरुस्त होत आहे.

गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव केसवड यांच्या हस्ते नारळ फोडून या कामाला सुरवात करण्यात आली. गावातील उपसरपंच देवीदास होळकर, माजी उपसरपंच अविनाश पवार, ग्रामपंचायत सदस्य अशोक लवांडे, संजय पवार, नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पवार, गोरक्ष होळकर, उपाध्यक्ष सागर केसवड, रघुनाथ केसवड, दादा शेलार, आण्णा पवार, बन्शीभाई आत्तार, महेंद्र भालेराव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या