कोंढापुरी तलावात चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी

Image may contain: 12 people, people smiling, people standing
कोंढापुरी, ता. 2 डिसेंबर 2018: येथील शासकीय तलावात चासकमान धरणाच्या सुरू असलेल्या आवर्तनातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याची मागणी चासकमानचे विभागीय अधिकारी ए.एस.चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

येथील तलावाच्या पाण्यावर कोंढापुरी, रांजणगाव गणपती, गणेगाव, खंडाळे, पिंपरी दुमाला, वाघाळे आदी गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. या तलावातील पाण्याने सध्या तळ गाठला आहे. त्यामुळे सध्या वरील सर्वच गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांबरोबरच जनावरांनाही पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. मेंढपाळांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. चालू आवर्तनातील पाणी कोंढापुरी तलावात सोडल्यास किमान दीड ते दोन महिने पाणीटंचाई भासणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

यावेळी नामदेव पाचुंदकर, पिंपरी दुमालाचे माजी सरपंच दिलीप खळदकर, गणेगाव खालसाचे तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष मुक्ताराम बांगर, ईश्वर बांगर, दिनेश गायकवाड, पोपटराव गायकवाड आदीसह कोंढापुरी, गणेगाव खालसा, पिंपरी दुमाला या ठिकाणचे ग्रामस्थ उपस्थित होते.

चासकमान कालव्याला आवर्तन सोडल्यावर कोंढापुरी तलावात पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे येथील परिसरातील शेतकरी बांधवांची पिके जळून चालली आहेत. तसेच रांजणगाव ग्रामपंचायतची पाणी पुरवठा योजना ही या तळ्यावर अवलंबून असल्यामुळे या तलावात टक्केवारी नुसार पाणी सोडावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या