बोरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा (Video)

गुनाट, ता. 2 डिसेंबर 2018 (तेजस फडके): राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ पुणे व चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समर्थ भारत विशेष शिबिराचे आयोजन 27 नोव्हेंबर 2018 ते 3 डिसेंबर 2018या कालावधीत सुरू असून, शिबीरात दरम्यान वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या शिबिराच्या श्रमदानाचा एक भाग म्हणून स्वयंसेवकांनी आज 50 फुट लांब व 5 फुट उंचीचा वनराई बंधारा बांधला. या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

या शिबीरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते व संस्थेचे सहसचिव नंदकुमार निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. सुनिल कवादे, डॉ. अजित चंदनशिवे, प्रा. पल्लवी ताठे व प्रा. किशोर थोपटे, सरपंच दिप्तीताई करपे, गोरक्ष धुमाळ, दत्तात्रय गाडे, गणेशराव करपे, कृषि सहायक जयवंत भगत, विजय घावटे यांनी सहकार्य केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या