मारूती कदम यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार

Image may contain: 11 people, people smiling, people standing
भांबर्डे, ता. 4 डिसेंबर 2018: येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मारूती सिताराम कदम यांना खासदार सुप्रिया सुळे व आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते ‘जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पवार पब्लिक चॅरीटेबल ट्र्रस्ट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कदम यांना समारंभपूर्वक हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष अरूण थोरात, तालुकाध्यक्ष भानुदास सात्रस, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल शितोळे, उपाध्यक्ष सुभाष वेताळ, चांगदेव पिंगळे, प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, शिक्षक परीषदेचे तालुका कार्याध्यक्ष प्रा. एन. बी. मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते. तालुक्यातील शैक्षणिक, सामाजीक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कदम यांचे अभिनंदन केले आहे.

विठ्ठलवाडीतील १२ बालकवींना बालसाहित्य रत्न पुरस्कार
Image may contain: 12 people, people smiling, people standing
विठ्ठलवाडी, ता. 3 डिसेंबर 2018: येथील १२ बालकवींना महाराष्ट्र साहित्य परिषदेने बाल साहित्य रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, अशी माहिती मुख्याध्यापक सुरेश थोरात यांनी दिली.

महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण शाखेच्या वतीने आयोजित काव्यवाचन व काव्यलेखन स्पर्धेत विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिरच्या बालकवींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. काव्यवाचन स्पर्धेत लहान गटात अनुजा सांगळे, अविनाश वारकरी, वैष्णवी गवारे तर मोठ्या गटात प्रतीक्षा गवारे, प्रियंका मरगळे, ऋतुजा भरणे तसेच काव्यलेखन स्पर्धेत लहान गटात ऋतुजा बर्डे, अंजली लोले, विशाल नांगरे तर मोठ्या गटात प्रतीक्षा गवारे, ऋतुजा भरणे व साक्षी गवारे या बालकवींना महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण शाखेच्या वतीने पाठ्यपुस्तकातील कवी तुकाराम धांडे यांच्या हस्ते बाल साहित्य रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या बालकवींना कलाशिक्षक प्रवीण जगताप यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष निवृत्तीअण्णा गवारे यांनी पुरस्कारार्थी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या