वाघाळे येथे निवड चाचणी स्पर्धेत १८१ पैलवाण सहभागी

Image may contain: 2 people, people smiling, people standing, wedding, basketball court and outdoor
वाघाळे, ता. 3 डिसेंबर 2018: येथे आयोजीत महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत शिरूर तालुक्यातील १८१ पैलवाण सहभागी झाले होते.

शिरूर तालूका कुस्तीगीर संघ व सी एम चषक स्पर्धा यांच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष रामभाऊ सासवडे, शिरूर तालुका अध्यक्ष कानिफनाथ गव्हाणे, कार्याध्यक्ष झेंडू पवार, संतोष साकोरे, अप्पा धुमाळ, उपसरपंच राजेंद्र भोसले, शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब काटे, राजेंद्र धायबर, दिलीप थोरात, आनंदराव सोनवणे, संतोष गोरडे आदी उपस्थित होते.

स्पर्धेतील गट निहाय विजेते पुढील प्रमाणे : १४ वर्षा खालील किशोर विभाग: २५ किलो : दिगंबर थोरात  (वाघाळे), २८ किलो :किरण  कऱ्हे ( कर्डेलवाडी), ३२ किलो :साई उमाप  (जातेगाव), ३५ किलो : अमोल कऱ्हे  (कर्डेलवाडी), ३८ किलो : अमित कुलाळ (अरणगाव), ४२ किलो : साहिल होलगुंडे (आनोसेवाडी). १७ वर्षा खालील कुमार विभाग : ४५ किलो : गणेश  सरके (न्हावरा), ४८ किलो  : अजय फुलफगर (आंबळे), ५१ किलो : सावळेराम बरकडे (मलठण),५५ किलो:शुभम काळे (निमोणे), ६० किलो : संग्राम शेळके  (रांजणगाव गणपती), ६५ किलो : रविकुमार  गव्हाणे (कुरुळी), ७१ किलो : प्रज्वल थोरात  (वाघाळे), ८० किलो : ओंकार येलभर  (मोटेवाडी),९२ किलो : करण पवार (आण्णापूर), ११० किलो : श्रेयस  होळकर (जातेगाव). वरिष्ठ गट गादी विभाग : ५७ किलो : राहुल यशवंत.

या कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणून मोहन खोपडे, रवी बोत्रे, प्रकाश घोरपडे, पप्पू कालेकर, प्रदीप बोत्रे, झेंडू पवार, बाळासाहेब भालेराव यांनी काम पाहिले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या