शिरूरमधून अपहरण केलेल्या चालकाची सुप्यामध्ये सुटका

No automatic alt text available.शिरूर, ता. 3 डिसेंबर 2018: टेंपो चालकाचे अपहरण करुन टेंपो मालकाकडे खंडणीची मागणी करणाऱया दोन आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव मंदिराजवळ टेंपो व होंडा सिटी मोटार यांमध्ये किरकोळ अपघाताची घटना घडली होती. यानंतर या टेंपोचा चालक दादा उर्फ श्रीकृष्ण ज्ञानेश्वर साबळे (वय. २४, रा. बहुळ, ता. खेड) यास आरोपींनी होंडा सिटीमध्ये घेऊन नगरच्या दिशेने पळवून नेले. व त्यानंतर आरोपींनी  टेंपो मालकाकडे ट्रकचालकाच्या सुटकेसाठी दीडलाख रुपयाच्या पैशाची मागणी केली होती.

याबाबत सदरील टेंपो मालकाने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या ठाणे अंमलदार यांना याबाबत माहिती दिली. रांजणगाव पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी वेगाने सुञ हलवत तपासाची दिशा ठरवली. अहमदनगर पोलिसांना याबाबत माहिती कळवून होंडा सिटी मोटारचा तपास सुरु केला. या तपास पथकातील पोलिसांनी सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिसांच्या मदतीने होंडा सिटी (एम.एच.१४ जि.ए.७००४) मधील आरोपी निलेश आबासाहेब माने व गणेश शंकरराव दांडगे (दोघेही रा.चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांना ताब्यात घेउन टेंपो चालकाची सुखरुप सुटका केली.

या तपासात रांजणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांच्यासह कालिदास शिंदे, उमेश कुतवळ, अमोल नलगे, सुपा पोलिस स्टेशनचे शेरकर यांनी महत्वाची कामगिरी बजावली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या