...तर दोघांचे प्राण नक्कीच वाचले असते

Image may contain: car and outdoor
कोरेगाव भीमा, ता. 4 डिसेंबर 2018 : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भीमा नदीवरील पुलाच्या वळणावर मोटारीच्या धडकेत दोन पादचारी तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या मृतांना वेळीत उपचार मिळाले असते तर त्यांचे प्राण नक्कीच वाचले असते.

भीमा नदीवरील पुलाच्या वळणावरील महामार्गालगतच्या संरक्षक लोखंडी बॅरिकेड्‌ला धडकून खड्ड्यात पडल्याने मोटारीचाही चक्काचूर झाला. या अपघातात संतोष मनू माने (वय 38) व राजेंद्र काकुराम जाधव (वय 42, दोघेही रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आशा संतोष माने यांनी तक्रार दिली. हमाली काम करणारे संतोष माने व त्यांचा मामेभाऊ राजेंद्र जाधव हे दोघेही कोरेगावातील घरी पायी येत होते. यावेळी त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांना वेळेत उपचार मिळाले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. या वळणावर वाहनांचा वेग प्रचंड असल्याने यापूर्वीही बॅरिकेड तोडून यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. रस्त्यालगत खोल झाडी असल्याने अपघातग्रस्त वाहन लवकर लक्षात येत नाही. या ठिकाणी पथदिवे लावून बॅरिकेडची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

शिक्रापूर पोलिसांच्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा हद्दीत रविवारी (ता. 9) रात्री दहाच्या सुमारास भीमा नदीवरील पुलाच्या वळणावर पुण्याकडून शिरूरकडे जाताना चालकाचा ताबा सुटून मोटारीची (एमए 12, क्‍यूएन 5055) पायी जाणाऱ्या दोघांना धडक बसली. त्यानंतर ही मोटार महामार्गालगतचे लोखंडी संरक्षण बॅरिकेड तोडून खोल झाडीत कोसळली. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मोटारीतील युवकांना बाहेर काढले. रात्रीच्या अंधारात मोटारीच्या धडकेने जखमी होऊन झाडीत पडलेले दोघे अपघातग्रस्त मात्र स्थानिकांना दिसले नाहीत. मात्र, दारूच्या नशेत मोटार चालविणाऱ्या युवकांनीही त्याबाबत तातडीने सांगितले नसल्याचा आरोप फिर्यादींनी केला.

दरम्यान, रविवारी रात्री उशिरापर्यंत माने व जाधव हे दोघेही घरी न आल्याने कुटुंबाने शोध घेतल्यानंतर या दोघा जखमींना झाडीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, या दोघांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर फरारी झालेल्या अज्ञात मोटारचालकाविरोधात शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटारीतील तरुणांचा पोलिस शोध घेत आहेत.

Image may contain: car, tree, outdoor and nature

तोडलेले दुभाजक बंद करण्याची मागणी

पुणे-नगर (ता. शिरूर) राज्य महामार्गावरील अनधिकृत तोडलेल्या दुभाजकाची त्वरित व कायमस्वरूपी दुरुस्ती करून हा दुभाजक बंद करावा, अशी मागणी मागणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाकडे केली आहे. काही व्यावसायिकांनी स्वतःच्या हितासाठी अनधिकृत पद्धतीने तोडले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या