पुणे-नगर रस्त्यावर अपघातात एकाचा जागीच मृत्यू


शिक्रापूर, ता. 6 डिसेंबर 2018: पुणे-नगर रस्त्यावर चोविसावा मैल (ता. शिरूर) येथे दुचाकीला चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार; तर एक महिला जखमी झाली. याबाबत नीलेश सुरेश धायरकर यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) चोविसावा मैल येथील शेतकरी दशरथ बाबूराव धायरकर व त्यांच्या मुलाची सासू लक्ष्मीबाई बबन गायकवाड हे दोघेजण बुधवारी (ता. 5) सकाळी शिक्रापूरहून दुचाकीवरून घराकडे जात होते. पुणे-नगर रस्त्यावर भैरवनाथ हॉटेलजवळ चोविसावा मैल येथे पाठीमागून भरधाव येणाऱ्या चारचाकीने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यावेळी दुचाकीवरील दशरथ बाबूराव धायरकर यांच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले; तर लक्ष्मीबाई गायकवाड जखमी झाल्या. चारचाकी चालक सुनील बाबूराव बाजारे (रा. बुर्केगाव, ता. हवेली) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या