पहा, शिरूर तालुक्यात रस्ता असा दुरुस्त करतात...

Image may contain: sky, outdoor and nature
तळेगाव ढमढेरे, ता. 6 डिसेंबर 2018: तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याची दुरावस्था झाली असून, दोन महिन्यापूर्वी या रस्त्याची दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, रस्त्यावरील खड्डे व सार्इडपट्टया भरण्यासाठी माती व मातीमिश्रीत मुरूम वापरल्याने ही दूरूस्ती निरूपयोगी ठरली आहे. पुन्हा रस्त्यावर खड्डे जैसेथे झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याची पक्या स्वरूपात दुरूस्ती करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

तळेगाव ढमढेरे-न्हावरे या रस्त्याची नुकतीच डागडुजी करण्यात आली होती. परंतु, ती देखील काम चलावू असल्याने पुन्हा सर्वच रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत तर ठिकठिकाणी रस्ता खचलाही आहे. खचलेल्या रस्त्यामुळे व रस्त्यावरील मोठमोठया खड्यामुळे या रस्त्यावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. सार्इड पटयाही तुटल्याने वाहने रस्त्यावरून खाली उतरणे व परत वरती घेणे जिकीरीचे ठरत आहे, त्यामुळे साइड पटयाही भरून घेणे आवश्यक आहे.

सोलापूर व नगर महामार्गांना जोडणारा हा जवळचा राज्य मार्ग असल्याने रांजणगाव, सणसवाडी, कोरेगाव भिमा व चाकण औद्योगिक क्षेत्रासाठी कच्च्या मालाची तसेच तयार पक्क्या मालाची वाहतूक मोठया प्रमाणात या मार्गाने होते. मुंबर्इच्या दिशेनेही अवजड मालवाहतुक मोठया प्रमाणात होते. शेतमाल तसेच प्रवासी वाहतूकीमुळेही हा मार्ग नेहमीच वर्दळीचा असतो. शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरे-चौफुला हा प्रस्तावित चौपदरी मार्ग असल्याने या मार्गाचे काम सुरू होणार असल्याची परीसरात अनेक दिवसापासून चर्चा आहे. लोकप्रतिनिधीही याला दुजोरा देतात. मात्र, प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे परीसरातील नागरीकामध्ये या रस्त्याच्या चौपदरीकरणा विषयी साशंकता निर्माण झाली आहे. या रस्त्याची डांबरमीश्रीत खडीच्या सहाय्याने तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

रस्त्याची दुरुस्ती अशा प्रकारे करतात का? आगीतून फुफाट्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ता दुरुस्तीचे पैसे गेले कोठे? याची चौकशी व्हायला हवी, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या