टाकळी भीमा येथील रांजण खळग्यांची दुरावस्था

टाकळी भीमा, ता. 9 डिसेंबर 2018: येथील नैसर्गीक देण लाभलेल्या रांजण खळग्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असून, सध्या ते भग्न अवस्थेत पडले आहेत. या  रांजण खळग्यांकडे शासनाने लक्ष देवून त्यांची नीगा राखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची  मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

भीमा नदी पात्रात असलेले रांजणखळगे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. काळे पाषाण खडक त्यावरील पांढऱ्या रंगाचे मिठाचे क्षार, विविध प्रकारचे शंख शिंपले, त्यावरील बारीक तांबडी रेती, चाऱ्याची हिरवळ, नैसर्गीक छोटे धबधबे यामुळे येथील वातवरण निसर्ग रम्य आणि प्रेक्षणीय आहे. नदीत असणाऱया खळग्यांचे  वैशिष्ट्य म्हणजे खळग्यामधील पाणी खारे आणि बाहेरील पाणी गोड आहे. रांजण खळग्यातील पाणीसाठा बाराही महिने टिकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मुबलक मिळते. या ठिकाणी असणारे कुंड माऊलाई देवी गावातील लोकांचे श्रद्धा स्थान आहे. आषाढ महिण्यात मोठ्या प्रमाणात महिला भाविक येतात. परंतु, या स्थळाकडे दुर्लक्ष होत आहे.

निसर्ग सौंदर्याची देणगी लाभल्याने रांजण खळगे असल्याणे टाकळी भिमा गावास तिर्थ क्षेत्र आणि पर्यटणाचा दर्जा मिळावा तसेच येथील रांजण खळग्याची निगा राखण्यासाठी व पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करूण देण्यासाठी शासना तर्फे प्रयत्न करण्यात, यावे अशी मागणीही ग्रामस्थांमधून होत आहे. या स्थळाची पाहणी करताना गावचे पोलिस पाटील प्रकाश कर्पे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय काळे, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक मनोज वडघूले, निवास साकोरे, तुषार नरसाळे, पांडूरंग काळे, किसन अवचीते आदि उपस्थीत होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या