राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार प्रा. आंबेकर यांना जाहिर

शिरुर, ता.१० डिसेंबर २०१८ (प्रतिनीधी) : अविष्कार सोशल अॅंड एज्युकेशनल फौंडेशन च्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार  शिरुर येथील चां.ता.बोरा महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा.विलास बापुराव आंबेकर यांना जाहिर करण्यात आला आहे.

अविष्कार सोशल फौंडेशन हि कोल्हापुर येथील संस्था गेल्या अनेक वर्षापासुन सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक क्षेञात कार्य करणारी संस्था असुन या संस्थेच्या सोलापुर जिल्हा शाखेच्या वतीने अक्कलकोट (जि.सोलापुर) येथे राज्य व राष्ट्रीय कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात येते.

या समारंभात विविध क्षेञात उल्लेखनीय काम करणा-या व्यक्तींना पुरस्कार देउन गौरविण्यात येते. या वर्षी(सन-२०१८)चा शैक्षणिक क्षेञात उल्लेखनिय कार्याचा गौरव म्हणुन शिरुर येथील प्रा.विलास बापुराव आंबेकर यांची राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.प्रा.आंबेकर हे चां.ता.बोरा महाविद्यालयात गेल्या २६ वर्षांपासुन अध्यापनाचे कार्य करत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेउन अक्कलकोट (जि.सोलापुर) येथे रविवार (दि.१६) रोजी हा पुरस्कार समारंभपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या