शिरूर नगरपरिषदेकडून अनधिकृत खोदाई करणा-यास दंड

शिरुर, ता.१० डिसेंबर २०१८(प्रतिनीधी) : शिरुर शहरात एकात्मिक उर्जा विकास योजनेंतर्गत करण्यात येणा-या भुमिगत विद्युतवाहिनी योजनेच्या कामासाठी कोणतीही खोदाई फी न भरता अनधिकृत खोदाई केल्याप्रकरणी सदर खोदाई करणा-या संस्थेस १ लाख ९२ हजार पाचशे इतका दंड केला असल्याची माहिती मनसेचे उपजिल्हाप्रमुख महिबुब सय्यद यांनी दिली.

याविषयी त्यांनी अधिक माहिती देताना सांगितली कि,शिरुर शहरात एकात्मिक उर्जा विकास योजनेंतर्गत करण्यात येणा-या भुमिगत विद्युतवाहिनी योजनेचे काम सुरु आहे.शिरुर नगरपरिषदेने शिरुर शहरात सात ठिकाणी रस्त्यांमध्ये भुमिगत केबल टाकण्यास परवानगी दिली होती.

या मध्ये सेंटर शाळा ते जिजामात गार्डन डीपी,ओंकार हॉस्पिटल ते निर्माण प्लाझा,पुनम स्वीट ते गुजरमळा,हार्दे दवाखाना ते संपुर्ण खारेमळा,शनिमंदिर डिपी ते शाळा क्र.५, पाबळ फाटा ते सर्टिफाईड स्कुल मार्गे जुना पुणे नगर रोड,आनंद सोसायटी अंतर्गत या ठिकाणी नगरपरिषदेने खोदाई कामासाठी परवानगी दिली होती.माञ सदर संस्थेने परवानगी न घेता सेंटर शाळा कोपरा ते हरिश्चंद्र टॉकिज मागील बाजुपर्यंत विना परवाना २२० मीटर लांबीची खोदाई केल्याचे नगरपरिषदेला आढळुन आले.तर या प्रकरणी सदर खोदाई करणा-या संस्थेस १ लाख ९२ हजार पाचशे इतका दंड केला असल्याचे सय्यद यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या