केंदूरमध्ये तमाशादरम्यान हुल्लडबाजांची झाली पळापळ...

शिक्रापूर, ता.१० डिसेंबर २०१८(प्रतिनीधी) : शिक्रापूर पोलीसांनी नाविन्यपुर्ण उपक्रम राबविला असून याञांमध्ये गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांना रोखण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी पाच फौजदारांचे खास पथक नेमले आहे.

सध्या गावोगावी याञांचा हंगाम सुरु आहे. यात्रा म्हटले की तमाशाचा कार्यक्रम आला. त्यातून गावातील गटातटामुळे अशा कार्यक्रमांत हुल्लडबाजी आणि गोंधळ ठरलेलाच. या गोंधळातुन अनेकदा होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमांवर विरजन पडते. यावर उपाय म्हणुन या हुल्लडबाजांना लगाम घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी पाच फौजदारांचे एक पथक नेमले आहे. हे फौजदार हद्दीनुसार आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन हुल्लडबाजांना वेसण घालण्याचे काम करीत आहेत. यातीलच फौजदार सोमनाथ दिवटे यांच्या पथकाने पहिलीच कारवाई केंदूर येथे शनिवारी रात्री तमाशादरम्यान केली आणि हुल्लडबाजांची चांगलीच पळापळ झाली.

सहायक पोलीस निरीक्षक मयुर वैरागकर यांनी या पथकाला कार्यक्रमांत हुल्लडबाजी करणाऱ्यांची जागीच धुलाई करण्याची सूचना दिली आहे.या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने, गणेश वारुळे, शिवशांत खोसे, एम. डी. निलंगेकर आणि सोमनाथ दिवटे हे पाच पोलीस उपनिरीक्षक हे काम करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या