काँग्रेसला अच्छे दिन; भाजपला दे धक्का

Image may contain: 1 person, smiling, closeup
नवी दिल्ली, ता. 12 डिसेंबर 2018: हिंदी पट्टय़ात भाजपच्या ताब्यात असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन महत्त्वाच्या राज्यांत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने लक्षणीय यश मिळवले असून, काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आले आहेत तर भाजपला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या विजयानंतर शिरूर तालुक्यात काँग्रेस कार्यकर्तांनी मोठा जल्लोष केला.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अनपेक्षित आणि दणदणीत विजय मिळाला आहे. तिथे ९० पैकी तब्बल ६८ जागा काँग्रेसने पटकाविल्या आहेत, तर भाजपला अवघ्या १६ जागा मिळाल्या आहेत. भाजपने तेथे ३३ जागा गमावल्या आहेत. राजस्थानात काँग्रेसला ९९ तर भाजपला ७३ जागा मिळाल्या आहेत. मध्य प्रदेशात मात्र काँग्रेसने ११३ आणि भाजपने १०९ जागा जिंकल्या आहेत.

छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या हिंदी पट्टय़ातील मतदारांनी प्रामुख्याने भाजपविरोधात मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. छत्तीसगडमध्ये अजित जोगी आणि मायावती यांच्या पक्षाची युती काँग्रेसला सत्तेपासून वंचित ठेवेल, हा भाजपचा अंदाजही पूर्ण चुकला आहे. उलट, तिथे ‘अजित जोगी’ फॅक्टरची धूळधाण उडाली आहे. मध्य प्रदेशात पंधरा वर्षे राज्य करणाऱ्या शिवराजसिंह सरकारविरोधात शेतकरी, दलित-मुस्लिम आणि उच्चवर्गीयांनीही मतदान केल्याने त्याचा फायदा काँग्रेसला झालेला दिसत आहे. राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे दिलेले आश्वासनही काँग्रेसच्या पथ्यावर पडले.

राजस्थानमध्ये भाजपच्या केंद्र आणि राज्य नेतृत्वातील विसंवादच चव्हाटय़ावर आला होता. या राज्यात काँग्रेसमधील गटबाजी मध्य प्रदेश इतकी उघडपणे समोर आली नाही. तेलंगणमध्ये मात्र चंद्रशेखर राव यांचा करिष्मा कायम राहिला असून मतदारांनी त्यांना पुन्हा संधी दिली आहे. तेलंगणमधील शेतीची समस्या हाताळण्यात आलेले यश चंद्रशेखर राव यांना लाभदायी ठरले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एकहाती किल्ला लढवल्याचे प्रकर्षांने पाहायला मिळाले. या तीनही राज्यांत काँग्रेस एकटा लढला. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बसप आणि सप या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसशी आघाडी करणे जाणीवपूर्वक टाळले होते. तरीही राहुल यांनी भाजपच्या स्थानिकच नव्हे केंद्रीय नेतृत्वालाही आव्हान दिले. ‘राफेल’मधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा विधानसभेत फारसा प्रभावी ठरला नसला तरी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. मोदींविरोधात काँग्रेसचे अन्य नेतेदेखील राहुल यांच्या मदतीला आले नसल्याचे दिसले. काँग्रेसच्या बाजूने झुकलेल्या या निकालांनी राहुलने पक्षावरील पकड घट्ट केली असून विरोधी पक्षांच्या आघाडीतही त्यांचे राजकीय वजन वाढलेले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी
 • मध्य प्रदेशातील मजमोजणी पूर्ण, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
 • वादात मध्यस्थी करणाऱ्या खासदार गावितांशी बाचाबाची
 • मध्य प्रदेशात काँग्रेसचे सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरु, राज्यपालांकडे मागितली वेळ
 • मोदी-शाह काठावर पास, राहुल गांधी मेरीटमध्ये : सामना
 • जनतेच्या निर्णयाचं स्वागत, काँग्रेसचं अभिनंदन : नरेंद्र मोदी
 • तेलंगणा निवडणूक निकाल : टीआरएसने 88 जागा जिंकत सत्ता राखली
 • मिझोरम निकाल : काँग्रेसला दे धक्का, मिझो नॅशनल फ्रंटची सत्ता
 • मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा
 • भाजपच्या जुलमी राजवटीला चपराक : राज ठाकरे
 • मतदारांच्या धाडसाने देशाला नवी दिशा दिली : उद्धव ठाकरे
 • राजस्थानात भाजपचा सुपडासाफ, कॉंग्रेसची एकहाती सत्ता
 • पंतप्रधान मोदींनी मला धडा शिकवला : राहुल गांधी
 • पंतप्रधान मोदींना रोखण्याची काँग्रेसमध्ये क्षमता नाही : ओवेसी

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या