वाघोलीत राज्य स्तरीय मल्हार करंडक स्पर्धांचे आयोजन

Image may contain: text
वाघोली, ता. 13 डिसेंबर 2018 (योगेश पवार): भिवराबाई सावंत तंत्रनिकेतन वाघोली येथे राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन मल्हार करंडक अंतर्गत करण्यात आले आहे. मल्हार करंडक तानाजी सावंत यांच्या प्रेरणेने सुरु झालेला महोत्सव असून, यामध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो, रस्सीखेच, सामूहिक नृत्य, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, निबंध लेखन पथनाट्य, ढोल, लेझीम स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाघोली जे.एस.पी.एमचे संचालक डॉ. सचिन अदमाणे यांनी सांगितले कि, या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना निश्चितच वाव मिळेल तसेच विज्ञान प्रदर्शनामुळे नव्या पिढीचे वैज्ञानिक घडवण्यासही यामुळे मोठा हातभार लागेल. इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षणाचे महत्व, व्यक्तिमत्व विकास, तणाव व्यवस्थापन, संभाषण कौशल्य आदि विषयांवर त्या क्षेत्रातील मान्यवरांच्या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. विध्यार्थ्यांना डॉ. व्ही. आर. कायंदे (संचालक जे. एस.पी.एम), डॉ. व्ही. एम. कोल्हे (सहाय्यक सचिव एम. एस. बी. टी. ई पुणे) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मल्हार करंडक 2018 साठी गिरीराज सावंत (संचालक ज.शि.प्र. मं), ऋषिराज सावंत (संचालक ज.शि.प्र.मं), तसेच शिक्षण अधिकारी गणपत मोरे हे प्रमुख उपस्थित असणार आहेत.

गेल्या वर्षी 135 शाळांच्या 9000 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. मल्हार करंडक विद्याधाम प्रशाला देवदैठण या प्रशालेने पटकावला होता. स्पर्धत सहभागी होण्यासाठी www.jspm.edu.in या संकेतस्थळावर संपर्क करण्याचे आवाहन भिवाराबाई सावंत तंत्रनिकेतन मार्फत करण्यात आले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या