नेमबाजी स्पर्धेत विद्याधामच्या श्रुष्टीला सुवर्णपदक

शिरुर, ता. १४ डिसेंबर २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर येथील श्रुष्टी भानुदास गायकवाड हिने एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. जिल्हा क्रिडी अधिकारी कार्यालयाच्या वतीने नुकत्याच नेमबाजी स्पर्धा पार पडल्या.

शिरुर येथील विद्याधाम प्रशालेमध्ये श्रुष्टी हि शिकत असुन संदिप तरटे शुटिंग अॅकॅडमी येथे नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. श्रुष्टीने १४ वर्षाखालील वयोगटातील १० मीटर ओपन साईट एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले आहे.तर हर्षद जयवंत दंडवते याने मुलांच्या १७ वर्षांखालील वयोगटात कांस्यपदक प्राप्त केले.

स्पर्धेतील पदकप्राप्त खेळाडुंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना शुटिंग अॅकॅडमीचे प्रशिक्षक शरद तरटे, विद्याधाम प्रशालेचे प्रा. शेळके, प्रा. दळवी यांनी मार्गदर्शन केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या