व्हॉट्सअप ग्रुपवर अॅड करायला लागणार आता परवानगी

शिरूर, ता. 14 डिसेंबर 2018: सोशल मीडियावर माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आता कोणत्याही यूजरला परवानगीशिवाय अॅड करता येणार नाही. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून अशा प्रकारचे फीचर आणण्याविषयी सांगितले आहे, ज्यात ग्रुपमध्ये अॅड करण्यापूर्वी संबंधित यूजरची परवानगी घेणे बंधनकारक असेल.

भारतातील व्हॉट्सअप यूजर्सना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. कारण तुमच्या इच्छेविरोधात आता कुणीही तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. केंद्र सरकारने व्हॉट्सअपला अशा प्रकारचं फीचर डिझाईन करायला सांगितले आहे, ज्यात यूजरची सहमती घेणे आवश्यक असेल.

सध्या कोणत्याही यूजरला व्हॉट्सअपमध्ये अॅड करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. त्यामुळे अनेकांना त्यांच्या इच्छेविरोधात ग्रुपमध्ये अॅड केले जाते. ग्रुप का सोडला या कारणावरुन हल्ले झाल्याचे प्रकारही समोर आले होते. शिवाय, परवानगी न घेता ऍड केल्यामुळे गंभीर गुन्हे घडले असून, अश्लिल मजकूर व व्हिडिओ पाठवले जात होते. यामुळे आता लगाम लागणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या