कासारी फाट्यावर सिग्नल यंञणा कार्यान्वित

Image may contain: 11 people, people smiling, people standing and outdoor
शिक्रापूर, ता. १४ डिसेंबर २०१८(प्रतिनीधी) : पुणे - नगर महामार्गावरील कासारी फाटा येथे ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे.

पुणे नगर महामार्गावरील कासारी फाटा येथे जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स यांच्या वतीने ही ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे.कासारी फाट्यावर अनेकवेळा अपघात होऊन कित्येकांना प्राणास मुकावे लागले  आहे. यासंदर्भात संकेतस्थळ शिरुर तालुका डॉट कॉमनेही वारंवार आवाज उठवला होता.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कासारीचे सरपंच संभाजी भुजबळ व ग्रामस्थांनी  वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब माजी आमदार अशोक पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी व्यंकटेश कृपा च्या माध्यमातून तातडीने ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले. त्यानुसार ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या