दारूच्या नशेत स्वतःवर वार केल्याने युवकाचा मृत्यू

Image may contain: 1 person, closeup
कवठे यमाई, ता. 15 डिसेंबर 2018: दारूच्या नशेत पत्नीशी भांडण झाल्यानंतर स्वतः स्वतःच्या पोटावर चाकूने वार केल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना येथे गुरुवारी (ता. 13) पहाटे घडली. योगेश अशोक लाळगे (वय 34) असे मृत तरुणाचे नाव आहे.

योगेश लाळगे हे पत्नी वर्षा व सहा वर्षांची मुलगी सई यांच्यासह दोन वर्षांपासून आनंदा पवार यांच्या खोलीत राहात होते. वर्षा यांनी मलठण (ता. शिरूर) येथे लेडीज शॉपीचे दुकान सुरू केले आहे. गुरुवारी (ता. 13) पहाटे पाचच्या दरम्यान योगेश दुचाकीवरून बाहेर निघून गेला होता. त्यानंतर वर्षा या मलठण येथे दुकानात गेल्या होत्या. त्यानंतर संपत वागदरे यांनी तुमचा नवरा खूप दारू पिऊन आला असल्याचे वर्षाला सांगितले. पतीला घरात झोपवून वर्षा पुन्हा मलठण येथील दुकानात गेल्या. साडेसातच्या दरम्यान त्या घरी आल्या. योगेश चाकू घेऊन वर्षा यांच्या पाठीमागे लागला. त्या वेळी त्यांनी घरातून पळ काढला. पतीने घराचा दरवाजा बंद केला. काही वेळाने दरवाजा उघडून पाहिले असता योगेश फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अंगावरचा टी शर्ट वर करून पोटावर चाकू मारून घेतल्याचे योगेशने सांगितले. शुक्रवारी (ता. 14) सकाळी दरवाजा उघडला असता योगेश मृत झाल्याचे समजले.

दरम्यान, या यापूर्वीही असे अनेक वेळा चाकूने वार करून घेतल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळेच त्याकडे लक्ष दिले नाही. दारूच्या नशेत मला चाकूने मारेल या भीतीने रावडेवाडी (ता. शिरूर) येथे निघून गेल्याचा जबाब वर्षाने दिला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या