सोशल मीडियावर बारकाईने लक्ष: पोलिस अधीक्षक

पुणे, ता. 25 डिसेंबर 2018: तरुण वर्गापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहचवून त्यांच्यामध्ये सकारात्माक सक्षमता निर्माण करण्याची गरज आहे. सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवली जात आहे. येत्या 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे होणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत संपन्न होईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.

जिल्हानधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपमहापौर डॉ. सिध्दातर्थ धेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, ज्योती कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप पखाले आदी उपस्थित होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलिस प्रशासनाने केलेल्या् नियोजनाची माहिती दिली. सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवली जात असून प्रतिबंधात्मयक कार्यवाही चालू आहे. देशविघातक, समाजविघातक शक्तीर कार्यरत असतात, जाती-जातींमध्येच भांडणे लागावीत हाच त्यांचा हेतू असतो, अशा शक्तींपासून आपण सावध रहायला हवे. प्रशासन त्यांच्याकवर योग्य ती कारवाई करत आहे. प्रत्येक नागरिक हा पोलिस असतो असे नमूद करुन नागरिकांनी त्यांना काही नकारात्मक बाबी आढळून आल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

प्रारंभी विविध संस्थाद, संघटना आणि व्यक्तींनी प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी विविध संघटना, पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या