शिरुरच्या डॉक्टरांनी कोमात गेलल्या रुग्णाचे वाचवले प्राण

Image may contain: 5 people, people smiling, people sitting and eyeglassesशिरुर, ता.१६ डिसेंबर २०१८(प्रतिनीधी) : अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णावर मेंदुवर तातडीची शस्ञक्रिया करुन शिरुर च्या डॉक्टरांनी रुग्णाचे प्राण वाचविले आहे.

सविस्तर असे कि, शिरसगाव काटा (ता.शिरुर) येथील दिपक केदारी हे रांजनगाव औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामाला होते. कामावर जात असताना अचानक रस्त्यावर कुञे आडवे आल्याने कुञ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ते रस्त्याच्या दुभाजकावर आदळले. यात त्यांच्या मेंदुला जबर दुखापत झाली. स्थानिकांनी त्यांना तत्काळ शिक्रापुर येथील रुग्णालयात दाखल केले. ही घटना त्यांचे बंधु सतीश यांना समजताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तत्काळ पुढील उपचार घेणे गरजेचे होते. परंतु पुणे शहरापर्यंत रुग्ण जाईल असे वाटत नव्हते.

दरम्यान, शिरुर येथील श्री गणेशा हॉस्पिटलचे डॉ. अखिलेश राजुरकर यांचा सल्ला घेण्यात आला व मेंदुची शस्ञक्रिया शिरुर येथेचे करण्याचे ठरले. डॉ. अखिलेश यांनीही तत्काळ उपचार चालु केले. पुणे येथील प्रसिद्ध न्युरोसर्जन भगिरथ मोरे, भुलतज्ज्ञ संतोष पठारे यांसह श्रीगणेशा हॉस्पिटलचे डॉ. विशाल महाजन, डॉ. सौरभ पाठक, डॉ. सारंग पाठक, डॉ. राजेंद्र ढोले, डॉ. सागर केदारे व सहका-यांनी तातडीने मेंदुची अवघड शस्ञक्रिया यशस्वी पार पाडली. त्यानंतर काही दिवस कोमात रुग्ण असतानाही उपचारांची पराकाष्टा केली व यात यश येउन सदर रुग्ण व्यवस्थित चालू लागला व बोलूही लागला.


या विषयी बोलताना श्रीगणेशा हॉस्पिटलचे डॉ. राजुरकर यांनी सांगितले कि, सदर रुग्णाच्या नातेवाईकांनी विश्वास दाखविल्याने व रुग्णालयातील डॉक्टरांनी व सर्व स्टाफने कसोशीने प्रयत्न केल्याने या रुग्णाचे प्राण वाचवू शकलो आहे.

हॉस्पिलटचे नावः
डॉ. अखिलेश राजूरकर, 9764292508
श्री गणेशा हॉस्पिटल, बाबूरावनगर, पुणे-नगर महामार्ग (बायपास) शिरूर.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या