शिरसगाव काटा शाळेचे तालुकास्तरीय स्पर्धेत यश

Image may contain: 20 people, people smiling, people standing and outdoorशिरसगाव काटा, ता.१६ डिसेंबर २०१८(प्रतिनीधी) : तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत शिरसगाव काटा (ता.शिरुर) येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या विदयार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.

यशवंतराव कल, क्रीडा महोत्सवांतर्गत या संदर्भात नुकत्याच विविध स्पर्धा पार पडल्या.या झालेल्या स्पर्धांमध्ये १०० मीटर धावणे या प्रकारात मोहिनी विलास जगताप हिने प्रथम क्रमांक मिळविला. तर आशिष सुर्यवंशी ने १०० मीटर धावणे व उंच उडी प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला.वक्तृत्व स्पर्धेत आदित्य लक्ष्मण जगताप याने तृतीय क्रमांक मिळविला. खो-खो स्पर्धेत मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला.मोहिनी विलास जगताप हिची जिल्हापातळीवर निवड करण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांना कैलास गारगोटे व लक्ष्मण लंघे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल कदम,उपाध्यक्ष साधना जगताप,मुख्याध्यापक संतोष कटारिया, तंटामुक्तीचे अध्यक्ष सागर गराडे,शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजेंद्र गद्रे, घोडगंगा कारखान्याचे संचालक नरेंद्र माने, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कदम, सरपंच शोभा मोहन कदम, माजी सरपंच सतीश चव्हाण व शिरसगाव काटा ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या