राज्यात गुन्हे करणा-या चोरांना गुन्हे शाखेकडून अटक

No automatic alt text available.शिक्रापूर, ता. १६ डिसेंबर २०१८ (प्रतिनीधी) : रोकड लुबाडून पसार होणा-या अट्टल चोरट्यांना पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27/09/2018  रोजी शिक्रापुर गावचे हददीत  फिर्यादी हे अॅक्सीस बॅंकेमधून दोन लाख रू घेवून जात असताना बॅकेत बसलेल्या अनोळखी आरोपीने पाठीमागून येवुन फिर्यादीस  बॅंक आॅफ महाराष्ट्र  शाखेचा चेक देवून तुमचे मालकाने मला पैसे देण्यासाठी सांगीतले आहे असे सांगुन फसवणूक करुन रक्कम घेवून गेला होता. या बाबत शिक्रापु पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच प्रमाणे शिरूर पोलीस स्टेशन येथेही अशाच प्रकारचा गुन्हा अनोळखी आरोपीने केला होता.

या घटनेनंतर पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने गुन्हयाचा तपास सुरु केला होता. तसेच अशा प्रकारचे गुन्हे औरंगाबाद, नाशिक, सांगली व पुणे शहरामध्ये  केल्याबाबत सी.सी.टि.व्ही. फुटेज वरून माहिती संकलीत केली. सदर गुन्हयांचा तांत्रीक स्वरूपाने तपास केला.तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला अब्बास सैफुददीन उकानी व मुकेश परमेश्वर मेमन (दोघेही रा.वसई ईस्ट, गोखिंडगाव जानकीपारा,जि. पालघर) हे गुजरात राज्यामध्ये पुर्वीचे असे गुन्हे करणारे रेकाॅर्डवरील आरोपी असलेबाबत माहिती मिळाली.

त्याप्रमाणे पोलीसांना मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे आरोपी अब्बास सैफुददीन उकानी, उर्फ दत्तात्रय सोनु  शिंदे वय 44 वर्ष व मुकेश परमेश्वर मेमन हे शिक्रापुर परिसरामध्ये त्यांचे काळे रंगाचे स्कॉर्पीओ गाडीसह येणार असल्याची बातमी मिळाल्यावर त्याप्रमाणे एल.सी.बी. टिमने शिक्रापुर चाकण चैकामध्ये स्कॉर्पीओ गाडी (एम एच 04.एच.एफ. 2064) मधून वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींकडुन त्यांचेेकडे स्काॅर्पीओ गाडीसह गुन्हयामधील 80,000 रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकुण 5,09,000/- मुददेमाल जप्त केला. नमुद आरोपींनी खालील गुन्हे केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून शिक्रापुर, शिरूर, सिडको एमआयडीसी औरंगाबाद, क्रांतीचौक पोलीस स्टेशन, औरंगाबाद 5) वेदांतनगर पोलीस स्टेशन, औरंगाबाद 6) आडगाव पोलीस स्टेशन, जि. नाशिक 7) भद्रकाली पोलीस स्टेशन, नाशिक शहर 8) विश्रामबाग पोलीस स्टेशन, सांगली या ठिकाणी गुन्हे उघडकिस आले आहेत. या आरोपींवर यापुर्वी गूजरात राज्यात 20 गुन्हे दाखल असुन, त्यांनी गूजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, प.बंगाल, हरियाणा, उत्तरप्रदेश  या राज्यामधे गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. या गुन्हयाचा तपास  गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंढे, राजू मोमीन, दत्ता गिरमकर, पोपट गायकवाड याच्या पथकाने लावला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या