मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका: अजित पवार

Image may contain: 1 personबारामती, ता. 17 डिसेंबर 2018: मला भावी मुख्यमंत्री व पवार साहेबांना भावी पंतप्रधान म्हणू नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. कार्यकर्त्यांकडून चांगल्या भावनेतून मला भावी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना भावी पंतप्रधान असा उल्लेख केला जातो. पण हा उल्लेख टाळावा या उल्लेखामुळे मित्रपक्षातल्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावू शकतात, असेही अजित पवार म्हणाले.

एका कार्यक्रमावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, 'येणाऱ्या निवडणूका लक्षात घेऊन जमिनीवर पाय ठेवून वाटचाल करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला बहुमत कसे मिळेल याकडे लक्ष द्यावे. पाडापाडीमुळेच आमची माती झाली आहे, मात्र, हे वाक्य बोलत असताना त्यांची नजर प्रसारमाध्यांच्या कॅमेऱ्याकडे गेली आणि अजित पवार यांनी विषयाला बगल दिली, आणि म्हणाले अजित पवार काय बोलतात यावरच मीडियाचे लक्ष असते. अटेंशन, ब्रेकिंग न्यूज, असे वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्याकडे पाहून बोलत त्यांनी उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.'

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवसेना आणि भाजप एकाच माळेचे मणी आहेत. शिवसेना भाजपचे नेमके काय चाललंय हेच कळत नाही. पाच राज्यातील निवडणुकात भाजपचा पराभव झाला आहे. मात्र आता कर्जमाफी देणार असल्याचे सांगून गमावलेला जनाधार मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या