परवानगीशिवाय वीज मनोरा उभारल्याने न्यायालाचा दंड

Image may contain: tree, sky, outdoor and nature
शिक्रापूर, ता. 18 डिसेंबर 2018: केंदूर येथे जागामालकाच्या परवानगीशिवाय वीज मनोरा उभारला म्हणून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीला 3 लाख 39 हजार 463 हजारांचा दंड नुकताच पुणे सत्र न्यायालयाने केला आहे.

केंदूर येथील बाळकृष्ण ताथवडे यांच्या शेतात ऑक्‍टोबर 2013 मध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीने संबंधित जागामालकाच्या परवानगीविना आपले वीज मनोरे उभे करायला सुरवात केली. ताथवडे यांनी कंपनीला काम करण्यास मज्जाव केला. त्यावर कंपनीने केंद्र सरकारच्या टेलिग्राफ ऍक्‍ट 1885 नुसार परवानगी असल्याचे सांगितले. यावर ताथवडे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मदतीने व जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक न्यायालय व पुणे सत्र न्यायालयात दाद मागून कामाला न्यायालयातून लेखी हरकत घेतली. त्यानंतर न्यायालयाने डिसेंबर 2017 मध्ये कंपनीला ताथवडे यांना 3 लाख 39 हजार 463 रुपये एवढी नुकसान भरपाईपोटी रक्कम देण्याचे आदेश दिले. मात्र, कंपनीने दुर्लक्ष करून नुकसान भरपाईपोटी एकही रुपया दिला नाही आणि न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला. याच वरून तक्रारदार ताथवडे यांनी पुन्हा न्यायालयाकडे दाद मागितली. तसेच, कंपनीने या आदेशाचे उल्लंघन केल्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायालयाने पुन्हा आदेश देऊन कंपनीच्या मुंबई कार्यालयातील फर्निचर व जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. बाळकृष्ण गणपत ताथवडे यांनी दाखल केलेल्या दाव्यानुसार हा निकाल झाला असून, दंड वेळेत भरला नसल्याने न्यायालयाने कंपनीच्या मुंबई कार्यालयातील फर्निचर व जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, शिरूर तालुक्यात सध्या मनोरे व तारा ओढण्याचे काम सुरू आहे. शेतकऱयांना कोणतीही सुचना न देता काम सुरू केले जात आहे. शेतकऱयांनी हरकती घेतल्यास पोलिसांची धमकी दिली जाते, अशा स्वरूपाच्या तक्रारी नागरिक करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या